सोशल डिस्टन्सींग न पाळल्याबद्दल कोलशेतचे डी मार्ट सील
ठाणे
सोशल डिस्टन्सींग नियमाचे पालन न केल्याबद्दल आज ठाणे महानगरपालिकेच्यावतीने कोलशेत ढोकाळी येथील डी मार्ट सील करण्यात आले. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये याबाबतीत महापालिकेच्यावतीने यापूर्वीच मार्गदर्शक सूचना दिल्या असून सोशल डिस्टन्सींग नियमाचे पालन न करणा-यांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. या नियमाचे पालन न केल्याबद्दल आणि गर्दीचे नियंत्रण न केल्याबद्दल कोलशेत ढोकाळी येथील डी मार्ट सहाय्यक आयुक्त डाॅ. अनराधा बाबर यांनी सील केले.
दुसऱ्या दिवशीही ४ बांधकामे आणि १०५ हातगाड्यांवर ठामपाची कारवाई
ठाणे
महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये अनधिकृत बांधकामे आणि हातगाड्यांविरोधात कालपासून ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेली कारवाई आज दुसऱ्या दिवसीही (४ सप्टेंबर) सुरूच होतीय या कारवाईमध्ये एकूण चार बांधकामे जमीनदोस्त करण्याबरोबरच १०५ हातगाड्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली. कालपासून ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि हातगाड्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. कारवाईच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकूण ४ अनधिकृत बांधकामे आणि १०५ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दिवा प्रभाग समितीतंर्गत दोन आरसीसी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली तर माजिवडा –मानपाडा प्रभाग समितीतंर्गत एक आणि कळवा प्रभाग समितीतंर्गत एक आरसीसी बांधकाम तोडण्यात आले. प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये संपूर्ण शहरामध्ये एकूण १०५ हातगाड्या तोडण्यात आल्या. सदरची कारवाई परिमंडळ उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त यांनी पोलिस बंदोबस्तात केली.
0 टिप्पण्या