महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ.बी.सी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी
सुरेश तुळशीराम पाटीलखेडे यांची नियुक्ती
ठाणे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत कार्यरत ओबीसी विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ठाण्यातील काँग्रेसचे निष्ठावंत आणि अनुभवी, अभ्यासू अशी ओळख असलेले सुरेश पाटीलखेडे यांची ओबीसी विभागाचे प्रदेश प्रमोद मोरे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे. या नियुक्तीवदल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. महाराष्ट्रात ओबीसीं विभागामार्फत काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सुरेश पाटील खेडे यांच्यावर उपाध्यक्ष पदीची जबाबदारी सोपविल्याचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
सोनियाजींचा दृष्टीकोन व त्यांचे उद्दीष्टांचे महत्व ओळखून, अरिवल भारतीय काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभाग अध्यक्ष खा.ताम्रध्वज साहू, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष वाळासाहेब थोरात यांच्या मार्गदशनाखाली आपण सुयोग्य काम करून काँग्रेस पक्षाची प्रतिमा जन मानसांत उज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच ओबीसी विभाग अध्यक्ष मोरे यांनी दिलेली जबाबदारीनुसार महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे विचार, कार्य पोहोचवणार असून राज्यातील ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया पाटीलखेडे यांनी आपल्या नियुक्तीबद्दल दिली आहे.
१९८० साली ठाणे शहर युथ काॅंग्रेसच्या जनरल सेक्रेटरी पदापासून आली कारकिर्द सुरु करणारे सुरेश खेडेपाटील आजही ठाणे काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. १९९२-९५ दरम्यान ते काँग्रेस सेवा दलमध्येही कार्यरत होते. तसेच ठाणे जिल्हा काँग्रेसकमिटीचे २००४ साली त्यांनी सेक्रेटरीपद भूषवले होते तसेच निवडणुकांमध्ये निरिक्षक पदावर यशस्वी काम केले आहे. ठाणे काँग्रेसमधील अभ्यासू, सडेतोड, स्पष्टवक्ता म्हणून सुरेश पाटील खेडे यांची ओळख आहे. मागील चाळीस वर्षापासून ते काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते असून ओबीसी समाजामध्ये त्यांचे विशेष कार्य आहे. अनेक ओबीसी संघटनामध्ये ते पदाधिकारी आहेत. त्यांचा समाजाशी असलेला दांडगा संपर्क आणि कार्य यामुळेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीने त्यांच्यावर ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
0 टिप्पण्या