Top Post Ad

महापालिकेच्या धडक कारवाईत ७२ आस्थापना सील तर मास्क न लावणा-याकडून ५ लाख ७ हजाराचा दंड वसूल

सायंकाळी सातनंतर सुरु राहणारी ७२ आस्थापना सील 
महापालिकेची धडक कारवाई


ठाणे
सायंकाळी सातनंतर उघड्या राहणाऱ्या सर्व आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर काल प्रभाग समितीनिहाय शहरातील ७२ आस्थापनांवर धडक कारवाई करून आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. दरम्यान यापुढेही सदरची कारवाई सुरु ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.  राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सायंकाळी सातपर्यंत  सर्व आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. महापालिकेनही तशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त रोज सायंकाळी सात ते साडे सात या कालावधीत आपल्या प्रभागामध्ये फिरून  सुरू असणाऱ्या आस्थापना तसेच अन्न पदार्थाच्या स्टॅाल्सवर कारवाई करत आहेत.



मास्क  लावणा-यांकडून  लाख  हजाराचा दंड वसूल


ठाणे
 विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तीविरूद्ध ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये मास्क न वापरणाऱ्या १०१५ व्यक्तींविरूद्ध दंडात्मक कारवाई करून आजपर्यंत ५ लाख ७ रूपयांचा दंड वसूल केला. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई सुरू असून यापूढे देखील शहरात सदरची कारवाई सुरु राहणार आहे.      ठाणे महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून  सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये या ठिकाणी अनेक व्यक्ती विना मास्क संचार करतानाचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी त्याबाबतचा आदेश काढला होता. या आदेशनुसार महापालिका क्षेत्रात मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींविरूद्ध दंडात्मक कारवाई सुरु आहे.      


महापालिका हद्दीमध्ये दिनांक १२ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० या कालावधीत विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या एकूण १०१५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतंर्गत एकूण ५ लाख ७ हजार ५०० रुपये  एवढा दंड वसूल करण्यात आला.   यामध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये ७० हजार दंड वसूल करण्यात आला. वर्तकनगरमधून ३८ हजार तर लोकमान्यनगर-सावरकर प्रभाग समितीमधून ३५ हजार दंड वसूल करण्यात आला. वागळे प्रभाग समितीमधून ४७ हजार, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतंर्गत  १ लाख २० हजार  तर कळवा प्रभाग समितीमधून ३३,हजार ५०० एवढा दंड वसूल करण्यात आला. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये या कारवाईमध्ये एकूण ८१,७०० एवढा दंड वसूल केला तर दिवा प्रभाग समितीमध्ये एकूण २४,०००एवढा दंड वसूल करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com