एमजी मोटर इंडियाद्वारे भारतातील पहिल्या ऑटोनॉमस (लेव्हल १) प्रीमियम एसयुव्ही ग्लॉस्टरचे अनावरण
बहुप्रतिक्षित प्रीमियम एसयूव्हीची बुकिंग १,००,००० रुपयांत सुरु
मुंबई
एमजी मोटर इंडिया ने भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल१) प्रीमियम एसयुव्ही, एमजी ग्लॉस्टर सादर केली. भारतातील पहिली इंटरनेट कार हेक्टर, भारतातील पहिली इंटरनेट इलेक्ट्रिक एसयुव्ही झेडएस इव्ही यानंतर ग्लॉस्टर हे एमजीचे तिसरे बहुप्रतिक्षित उत्पादन आहे. लक्झरीयस फोर-व्ही ड्राइव्ह एमजी ग्लॉस्टरची प्रीबुकिंग आता एमजी मोटर इंडिया च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारतातील २०० पेक्षा जास्त केंद्रांवरही ही सुविधा आहे. ग्राहक त्यांच्या बहुप्रतिक्षित प्रीमियम एसयूव्हीला १,००,००० रुपये या किंमतीत बुक करू शकतात.
एमजी ग्लॉस्टर ही या सेगमेंटमधील पहिली अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम आहे. यातील काही वैशिष्ट्यांमध्ये अडाप्टिव्ह क्रुस कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट आदींचा सहभाग आहे. तर फॉरवर्ड कोलायजन वार्मिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन ही देखील वाहनाची वैशिष्ट्ये आहेत. ग्लॉस्टर मध्ये बहुविध ड्रायव्हिंग मोड्स आहेत. व्हेइकल ऑफ रोडिंगदरम्यान नियंत्रण मिळवण्यासाठी यात इंटेलिजंट ऑल टेरेन सिस्टिम असून यात समर्पित रिअल डिफरन्शिअल आणि बोर्गवॉर्नर ट्रान्सफर केस आ अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक शिफ्ट ऑफ द फ्लाय टेक्नॉलॉजी आहे. यात स्नो, मड, सँड, इको, स्पोर्ट, नॉर्मल आणि रॉक या नावांचे सात वेगवेगळे ड्राइव्ह मोड्स आहेत.
एमजी मोटर इंडिया चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले. “पहिल्या ऑटोनॉमस (लेव्हल १) प्रीमियम एसयूव्हीच्या लाँचिंगद्वारे आम्ही आज भारताच्या वाहन क्षेत्रात नवा अध्याय सुरू करत आहोत. एडीएएस तंत्रज्ञानासह आपला एकुणच ड्रायव्हिंगचा अनुभव वाढवण्यासाठी विविध परिस्थितींमध्ये ग्लॉस्टर चा सेन्स आणि निर्णयक्षमता पाहू शकता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर- ग्लॉस्टर ही केवळ कार नसून, केवळ आपला आणि आपल्या सुरक्षिततेचा आणि आपल्या सोयीचा सदैव विचार करणारी हाय-टेक असिस्टंट आहे. सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये, उच्च रोड प्रेझेन्स, पॉवरफुल क्षमता, लक्झरियस इंटेरिअर अशी ही नवी एमजी ग्लॉस्टर आता नवा बेंचमार्क प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे.”
एमजी ग्लॉस्टर मधील आणखी वैशिष्ट्य म्हणजे एमजी आय-स्मार्ट तंत्रज्ञान, याद्वारे एकूणच वाहनाचा अनुभव वाढतो. या क्षेत्रात प्रथमच क्रिटिकल टायर प्रेशर व्हॉइस अलर्ट, शॉर्टपेडिया अॅप हा सुविधा आल्या असून याद्वारे स्मार्टफोनवर न्यूज समरी आणि अँटी थेफ्ट इमोबिलायझेशन दिले जाते. तसेच इंजिन इग्निशनदेखील दुरून थांबवता येते. मॅपमायइंडिया चे थ्रीडी मॅप यात असून त्यात रस्त्यावरील खड्डे, स्पीड अलर्टसह कोव्हिड टेस्टिंग सेंटरदेखील नकाशात दाखवले जातात. यासोबतच, ग्लोस्टर ग्राहकांना अॅपल वॉच कनेक्टिव्हिटी मिळेल. जेणेकरून ते व्हॉइस कंट्रोलसह गाना अॅप त्यावरून ऑपरेट करू शकतील. तसेच वैयक्तिकृत वेलकम व ग्रीटींग मेसेजदेखील त्यांना पाठवता येतील.
एमजी ग्लॉस्टरचे सर्वोत्कृष्ट प्रकारात जागतिक मान्यताप्राप्त ११८ पीएस पॉवरचे २.० डिझेल ट्विन टर्बो इंजिन आणि ४८० एनएमटोर्क असून यामुळे ही या कॅटेगरीतील सर्वात पॉवरफुल एसयुव्ही असेल. यात सेगमेंट लिडिंग १२.३ इंच एचडी टचस्क्रीन असेल तसेच सेगमेंट-फर्स्ट कॅप्टन सिट्स असतील. ६४ कलर अँबिएंट लायटिंग आणि पॅनोरमिक सनरुफ असेल. या एसयुव्हीमध्ये अॅगेट रेड, मेटल ब्लॅक, मेटल अॅश आणि वार्म व्हाइट असे चार रंग असतील.
0 टिप्पण्या