पाटणकर, पवार, जगदाळे, चव्हाण आदीं नगरसेवकांचा ऑनलाईन सभात्याग
ठाणे
गोंधळाचे विषय असल्यावर महासभा गुंडाळण्याचा प्रघात सत्ताधाऱ्यांनी यावेळीही बजावला. तीन महिन्याची महासभा अवघ्या चार तासात संपविण्यात आली. वेबद्वारे घेण्यात आलेल्या तब्बल तीन सभा आणि त्यातील अडचणीचे विषयही आज ८ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आले. नगरसेवकांचा सभात्याग प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांना बोलावण्यात आले होते. त्यामुळे ते सभागृहात उपस्थित होते. परंतु ठराविक नगरसेवकांनाच बोलविण्यात आल्याने काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. तर महासभेचे कामकाज चुकीच्या पध्दतीने सुरु असल्याचे सांगत मिलिंद पाटणकर, नारायण पवार, हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण आदींसह इतर तीन ते चार जणांनी ऑनलाईन महासभेत सभात्याग केला. आधी चाचणी करा, मग विधीमंडळाच्या धर्तीवर गडकरी रंगायतन किंवा डॉ. काशिनाथ घाणोकर नाट्यगृहात महासभा भरवावी. त्याआधी नगरसेवकांची कोरोना चाचणी करावी. त्यानंतर महासभा भरविल्यास महत्वपूर्ण विषयांवर चर्चा घ्यावी अशी मागणी सभात्याग केलेल्या नगरसेवकांनी व्यक्त केली. या संदर्भात नगरसेवक नारायण पवार यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे तशा स्वरुपाची मागणी देखील केली आहे. आता त्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन महासभा कुठे घ्यायची याचा निर्णय घेतला जाईल असे यावेळी महापौरांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या महामारीमुळे ठाणे महापालिकेची अद्याप महासभा झाली नव्हती. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील खंडीत आणि मार्च महिन्याची रद्द झालेली आणि सप्टेंबर महिन्याची ताजी महासभा एकाच दिवशी लावण्यात आली. ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या महासभेत कोरोना, रस्त्यांची झालेली दुरावस्था, तीन महिन्यांचा मालमत्ता करमाफी, महापालिकेची विस्कटलेली आर्थिक स्थिती यावर चर्चेची अपेक्षा होती. मात्र या ऑनलाईन वेब महासभेचा पुरता फज्जा उडाला असल्याने ठाणेकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. डिजी ठाणेचा मोठा गाजावाजा करीत डिजीटल ठाण्याचा नारा देणाऱ्या ठाणे महानगर पालिकेतील पहिल्याच वेब महासभेत नगरसेवकांना ना महापौर दिसत होते, ना अधिकारी त्यात विषय कोणता सुरु आहे, चर्चा काय करायची आणि एकाच वेळेस सर्वच नगरसेवक बोलत असल्याने या महासभेचा पुर्ता गोंधळ उडाला
इतकेच नाही तर डिजी ठाणे असलेल्या पालिकेत महासभा सुरु असतांनाच इंटरनेट सेवाही पाच ते दहा मिनिटांसाठी बंद झाले होते. त्यामुळे नगरसेवकांमध्ये गोंधळ उडाला. विशेष म्हणजे एखाद्या विषयावर चर्चा करीत असतांना एक नगरसेवकाने बोलणो अपेक्षित असतांना अनेक नगरसेवक एकाच वेळेस बोलत असल्याने कोण काय बोलत आहे, याचाही थांगपत्ता लागत नव्हता. कोणते अधिकारी, कोणते नगरसेवक नव्हती.अधिका:यांनी केलेले स्पष्टीकरण समजू शकले नाही. त्यामुळे या महासभेच्या आयोजनाचा मूळ उद्देशच फसल्याचे दिसून आले. मात्र सत्ताधाऱ्यांनी नेहमी प्रमाणे गोंधळात आणि अतिघाईत अडचणींच्या विषयांसह सर्वच विषय मंजुर करून घेतले. या महासभेत कोरोनावर चर्चा करण्यासाठी नगरसेवक तयार होते, याशिवाय इतरही शहराच्या दृष्टीने महत्वाचे विषय चर्चेसाठी होते. गेल्या पाच महिन्यांत महासभा न झाल्यामुळे ठाणो शहरातील अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा होती. शहरातील कोरोनाची स्थिती, मालमत्ता कर व पाणीपट्टी करामध्ये नागरिकांना दिलासा, महापालिकेची आर्थिक स्थिती आदींबाबत महासभेत खुलासा होण्याची अपेक्षा होती. मार्चच्या विषय पत्रिकेत लाखो ठाणोकरांच्या हिताच्या क्लस्टर विषयावर चर्चा होणार होती. मात्र, त्याबाबत काहीही निर्णय वा चर्चा झालेली नाही.
0 टिप्पण्या