Top Post Ad

तब्बल १ कोटी ७० लाख ४५ हजार ५९६ रुपयांचा गुटखा जप्त

तब्बल १ कोटी ७० लाख ४५ हजार ५९६ रुपयांचा गुटखा जप्त



ठाणे


संपूर्ण राज्यात गुटखा विक्रीवर कायदेशीर बंदी असतानाही ठाण्यामध्ये गुटखा विक्री जोरात सुरु आहे. या गुटखा विक्रेत्यांना कायद्याची कुठलीही भिती राहीली नाही. ठाण्यात अनेक पान विक्रेत्यांच्या ढाब्यावर गुटख्याची खुले आम विक्री होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने  राज्यात गुटखाबंदी लागू केली. त्यानुसार  गुटखा, पानमसाला, तंबाखू-निकोटिन-मॅग्नेशियम कार्बोनेटचा समावेश असलेल्या कोणत्याही पदार्थाचे उत्पादन-साठवणूक-वितरण-विक्री करण्यास बंधी घालण्यात आली आहे. याचे उल्लघन करणाऱयांस अत्यंत कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.  असे असतानाही गुटखा ठाण्यात येतो कुठून हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

ठाण्यात तब्बल पावणेदोन कोटींचा गुटखा पकडण्यात पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागास यश आले आहे. पाच ट्रकमधून हा साठा ठाणे व मुंबई परिसरात विक्रीसाठी पाठवण्यात येत होता. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात ४ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुटखा तस्करी करणाऱ्या वाहनचालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  ठाण्यातील गायमुख घोडबंदर रोड भागातून जाणाऱ्या रस्त्यावर पाच ट्रकमधून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी सापळा लावून हे ट्रक पकडले. या सगळ्या वाहनांची तपासणी केली असता त्यात १ कोटी ७० लाख ४५ हजार ५९६ रुपयांचा गुटखा साठा आढळला. हा गुटखासाठा व ५० लाख रुपये किमतीची ५ वाहने अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com