दिवा प्रभाग समितीमधील संगणक आणि फाईल चोरी प्रकरणात अनधिकृत बांधकामांच्या सात तर कोविडसाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्याच्या दोन फायलींचा समावेश
ठाणे
ठाण्यात कोरोनाचे संकट आजही कायम आहे, परंतु अशा परिस्थितीत कामाच्या ठिकाणी तत्पर राहणे महत्वाचे मानले जाते. परंतु अतिरिक्त नगरअभियंता अर्जुन आहिरे हे वारंवार कामाच्या ठिकाणी हजर नसल्याचे दिसून आले आहे. तसेच अधिकारी व पदाधिकाऱ्यांचेदेखील ते फोन उचलत विभागीय नव्हते. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळेतही संपर्काबाहेर असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पदाधिकारी यांचे देखील फोन उचलत नव्हते. त्यामुळे आयुक्तांनी या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांना तोंडी समज तसेच ताकीदही देण्यात आली होती. परंतु त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही. त्यांच्या या बेशिस्तपणाच्या वर्तनामुळे त्यांच्यावर सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई करण्यात येत असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दिवा प्रभाग समितीमधील संगणक आणि फाईल चोरी प्रकरणात अनधिकृ त बांधकामांच्या सात तर कोविडसाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्याच्या दोन फायलींचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. या चोरीप्रकरणात याआधीच तत्कालीन सहाय्यक आयुक्त डॉ.सुनील मोरे यांच्यासह फिरोज खान नामक व्यक्तीवर शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील मोरे यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी देखील तपास सुरू केला असून कोणत्या फाईल चोरीला गेल्या आहेत याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. साक्षीदारांचे जबाब देखील नोंदवण्यात आले आहेत.
समिती कार्यालयातील अतिक्रमण विभाग आणि अकाउंट विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार सात अनधिकृत बांधकामाच्या आणि दोन कोविड निमित्त खरेदी करण्यात आलेल्या साहित्याच्या फाईल गहाळ असल्याचे उघड झाले आहे. ही माहिती पोलिसांना देणाऱ्या साक्षीदारांना धमकावण्याचे प्रकारही सुरू झाले असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली असून आता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. दरम्यान या सर्व प्रकारामुळे साक्षीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्याची मागणी पालिका वर्तुळातून होत आहे.
दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुनील मोरे यांच्यावर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी निलबनाची कारवाई केली असतानाच गुरुवारी अतिरिक्त नगरअभियंता अहिरे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली आहे. पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांसह नगरसेवकांचे फोन न उचलणे, कामाच्या ठिकाणी हजर न राहणे. आदी ठपके त्यांच्यावर ठेवत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. अहिरे याच्याकडील सर्व प्रशासकीय कामकाज काढून घेण्यात आले असून पुढील आदेशार्पयत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्याकडील प्रशासकीय कामकाजाचा भार उपनगर अभियंता प्रविण पापळकर यांच्याकडे सोपविण्यात आल्याचेही आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या