Top Post Ad

कॉन्टिनेन्टल वेअरहाऊस कॉर्पोरेशन कंपनी समोर कामगारांचे बेमुदत संप




कॉन्टिनेन्टल वेअरहाऊस कॉर्पोरेशन कंपनी समोर कामगारांचे बेमुदत संप

 




 

उरण  (विठ्ठल ममताबादे )

मे कॉंटिनेंटल वेअर हौसिंग कॉर्पोरेशन( न्हावा शेवा)लि. मु :खोपटे, तालुका -उरण, जिल्हा -रायगड  येथील मे. पर्ल फ्रेंट सर्विसेस प्रा. लिमिटेड कंपनीतील  कामगारांचा 31/3/2019 रोजी करार संपला असून या दिवसापासून ते आजतागायत कंपनीने  कामगारांच्या नवीन पगारवाढीच्या मागणीपत्रावर दिड वर्षे कोणतेही चर्चा न केल्यामुळे तसेच कपंनीच्या आड मुठ्या धोरणामुळे येथील कामगार आपल्या मूळ हक्क व अधिकार पासून वंचित राहिला आहे. त्यामुळे येथील कामगारांना योग्य तो त्वरित न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी दि 3/10/2020 पासून कपंनीच्या गेट समोरच बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.

 

आज दि 6/10/2020 रोजी या संपाचा चौथा दिवस आहे. अत्यंत हलाखीत जीवन जगत असलेले हे कामगार वर्ग सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. प्रामाणिक पणे काम करून पोट भरणाऱ्या या प्रामाणिक कामगारांच्या मागण्यांकडे कपंनी प्रशासन गेली दिड वर्षे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने कामगार वर्गांमध्ये तीव्र संताप व्यक्त केले जात आहे.कपंनी प्रशासनाने कामगारांच्या मागण्या कडे दुर्लक्ष केल्याने आज कामगार वर्गावर बेमुदत संप करण्याची वेळ आली असल्याची तीव्र भावना येथील कामगार वर्गांनी बोलून दाखवली. 

या बेमुदत संपात संतोष -घरत राज्य उपाध्यक्ष, संजय घरत -राज्य सचिव, गणेश पाटील -रायगड जिल्हाध्यक्ष, चंद्रकांत सोनावणे -नवी मुंबई जिल्हाध्यक्ष,  मधुकर जाधव -राज्य सचिव -बहुजन मुक्ती पार्टी,  करण (धोनी )भोईर -जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी, प्रसाद वाहुळे-भारतीय विद्यार्थी मोर्चा पनवेल तालुका, विशाखा ठाकूर -सरपंच खोपटे आदी मान्यवर या संपात सहभागी होते.

 

कामगार न्यायालय, कोर्ट कचेरी   तसेच अन्य ठिकाणी या विषयावर केस दाखल झाली होती सर्वच ठिकाणी कामगार वर्गाच्या बाजूने निकाल लागला आहे तरी कपंनी प्रशासन कामगार वर्गांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही त्यामुळे कामगार वर्गांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ कटिबद्ध असून आम्ही या गोरगरिबांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता लढा अधिक तीव्र केले जाईल. उद्या कोणाचे बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी कंपनीचे प्रशासन जबाबदार राहील यांची कपंनी प्रशासनाने नोंद घ्यावी - -संतोष घरत , कामगार नेते तथा राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ.


 

 



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com