अमेरिकेच्या आर्थिक मदतीबद्दल अनिश्चितेमुळे स्पॉट गोल्डच्या दरात वृद्धी
मुंबई,
अमेरिकेच्या आर्थिक मदतीबद्दल अनिश्चितेमुळे स्पॉट गोल्ड आणि बेस मेटलच्या दरात वृद्धी दिसून आली. चीनमध्ये जीडीपी वृद्धीसह आर्थिक कामकाजातही वाढ झाल्याने औद्योगिक धातूंना आधार मिळाला. तेलाचे उत्पादन वाढल्याने तसेच साथीच्या आजाराचे एकूण परिणाम यामुळे तेलाचे दर काहीसे घसरले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले. स्पॉट गोल्डचे दर ०.२८ टक्क्यांनी वाढून १९०४.३ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकेच्या मदत निधीबाबत अनिश्चितनेमुळे सोन्याचे दर स्थिर राहिले. अमेरिकेच्या हाऊस स्पीकर नँसी पेलोसी आणि ट्रेझरी सेक्रेटरी स्टिव्ह म्युचीन यांनी दोन्ही पक्षांमधील मतभेद सोडवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. परंतु यावर एकमत होण्याचे अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर या निधीच्या आशेवर दबाव येत आहे. युरोपमध्ये साथीमुळे निर्बंध अधिक कडक होत असल्याने सोन्याच्या दरांना आधार मिळाला. कारण जागतिक स्तरावर आणखी रुग्णसंख्या वाढत असल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याकडे कल वाढत आहे. दरम्यान, जागतिक मध्यवर्ती बँकांकडून हाय लिक्विडिटी मदत मिळाल्याने सोन्याचे दर यावर्षी २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.
कच्चे तेल: डब्ल्यूटीआय क्रूडचे दर काहीसे घसरलेे. ०.१२ टक्क्यांनी घट घेत ते ४०.८ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. साथीच्या आजाराचे वाढते परिणाम आणि लिबियातील तेल उत्पादनात वृद्धी झाल्याने तेलाच्या दरांवर परिणाम झाला. युरोप आणि उत्तर अमेरिकेत कोव्हिड रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्यानेही तेलाचे दर घसरले. याशिवाय, लिहियातील क्रूड उत्पादनातील वाढीमुळे तेलाच्या दरांवर परिणाम झाला. तसेच मागणीत उदासीनता व शरारा या सर्वात मोठ्या तेलक्षेत्रातील प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यानेही दरांत घसरण झाली. अमेरिकेच्या अधिकृत तेलसाठ्यांची अधिकृत माहिती जारी केली जाईल, त्याचा दरांवर परिणाम होईल. क्रूड यादीतील उच्च पातळी तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे किंमतीत घसरण होऊ शकते.
बेस मेटल्स: चीनमधील अर्थव्यवस्थेच्या निरंतर विस्तारामुळे बेस मेटलचे दर सकारात्मक स्थितीत दिसून आले. अमेरिकेकडून प्रोत्साहनपर मदतीच्या आशेनेही दरवाढ दिसून आली. जुलै २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीत चीनचा जीडीपी सुमारे ४.९ टक्क्यांनी वाढला आणि २०२० मधील दुसऱ्या तिमाहीत ३.२ टक्क्यांची वृद्धी दिसून आली. त्यामुळे औद्योगिक धातूंना आधार मिळाला. तथापि, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील नव्या कोरोना रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याने चीनबाहेरील मागणीवरही ताण आलाय त्यामुळे हा नफा मर्यादित राहिला. सप्टेंबर २०२० मध्ये चीनमधील प्राथमिक अॅल्युमिनिअमचे उत्पादन ३.१६ दशलक्ष टन एवढे झाली. ही वार्षिक वाढ ७.९ टक्के एवढी नोंदली गेली. अॅल्युमिनिअम दरवाढ आणि चीनमधील नव्या स्मेल्टर्सच्या वृद्धीमुळे उत्पादनात वाढ दिसून आली.
0 टिप्पण्या