भारतात ई-कॉमर्स व्यवहारात दुपटीने वाढ
फ्लिपकार्ट होलसेलच्या ʼबिग बिलियन ड़े`च्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल
मुंबई
यंदा भारतात कोरोना संसर्ग दरम्यान झालेले लॉकडाऊन च्या पार्श्वभूमिवर जास्तीत जास्त लोकांना कल हा ऑनलाइन खरेदीकडे वळण्याचे दिसून येत आहे. दसरा आणि दिवाळी हा सणासुदीचा काळ लक्षात घेता अनेक ई कॉमर्स व्यासपीठावर लोकानी खरेदी केल्याचे दिसून येत आहे. नुकताच फ्लिपकार्ट होलसेल आणि बेस्ट प्राईज कॅश अँड कॅरी स्टोअर्स पहिल्यांदाच ‘द बिग बिलियन डेज’ सेलच्या माध्यमातून खरेदीदारांना अनेक स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. देशभरातील किराणा आणि किरकोळ विक्रेत्यांनी उत्सवी पर्वाची धूम लक्षात घेऊन यामध्ये सहभाग घेतला.
लाखभर विक्रेत्यांहून अधिक हे छोटे किराणावाले असून देशातील 3,000 हून अधिक पिनकोडवर ते उपलब्ध आहेत. 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान बेस्ट प्राईज स्टोअर्स तसेच त्यांची ई-कॉमर्स चॅनल्स आणि अॅपवर खरेदीची सुविधा उपलब्ध झाली.
फ्लिपकार्ट’च्या बी2बी बिझनेस सदस्यांना पॅकेज फूड, होम केअर, पर्सनल केअर, इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे, कपडे, फूटवेअर तसेच सर्वसाधारण वस्तूंवर 60% पर्यंत बचतीचा लाभ मिळवता आला.
फ्लिपकार्ट होलसेल आणि वॉलमार्ट इंडियाचे सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड आदर्श मेनन म्हणाले की, “पहिल्यांदाच फ्लिपकार्टच्या बी2बी बिझनेसने द बिग बिलियन डेजचे आयोजन केले आहे. या माध्यमातून किराणा आणि एमएसएमई’द्वारे वार्षिक उपक्रमातंर्गत किंमत आणि सक्षम उत्पादने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. किराणा आणि एमएसएमई’ना समृद्धीचे दिवस दिसावेत यासाठी आम्ही आमची वचनबद्धता खोलवर रुजवून विक्रेता परिसंस्थेचे संवर्धन करतो. आम्ही आमच्या सदस्यांकरिता यावर्षीच्या सर्वोत्तम ऑफर्स घेऊन आलो आहोत. आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून, त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर बचतीच्या संधी घेऊन आलो आहोत. भविष्यात यासारखे आणखी यशस्वी उपक्रम होतील, आणि आगामी काळात बिग बिलियन डेज’मधील फ्लिपकार्ट होलसेल आणि वॉलमार्ट इंडियाचे स्वरूप अधिक भव्य आणि दिमाखदार असेल याकरिता प्रयत्नशील राहू.”
0 टिप्पण्या