हाथरस मनिषा वाल्मिकी बलात्कार हत्या प्रकरण
रमाई ब्रिगेड महिला संघटनेकडून योगी आदित्यनाथ सरकारचा तीव्र निषेध !
शहापूर
उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील दलित कुटुंबातील युवती मनिषा वाल्मिकी हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या प्रकरणी रमाई ब्रिगेड महिला संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने गुरुवारी योगी आदित्यनाथ सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करत ही घटना भारत देशातील सर्वात मोठी निंदनीय घटना असून या घटनेमुळे देशातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी कठोर कायदा बनवावा तसेच बलात्कार करून मानिषाची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करण्यात यावी आशा मागणीचे पत्र शहापूर तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांना देण्यात आले. हे पत्र नायब तहसीलदार वळवी यांनी स्वीकारले.
या प्रसंगी रमाई ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती गायकवाड, महासचिव सविता चव्हाण, ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्षा नीता पाटील, उपाध्यक्षा ज्योती गायकवाड, ठाणे शहर अध्यक्षा आसमा शेख, ठाणे शहर सचिव रंजिता कोणे, रेखा कांबळे, भारती पाटील, मुंबई शहर अध्यक्ष संदेश होडे, महासचिव राकेश आरावंदेकर, ठाणे शहर युवा अध्यक्ष सोमनाथ भोईर आदी उपस्थित होते.
यावेळी घोषणा देत योगी आदित्यनाथ सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला बलात्कार व हत्या करणाऱ्या आरोपींना लवकरच फाशी देण्यात यावी, वाल्मिकी कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी, मानिषाचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन न करता परस्पर तिचा अंत्यविधी कोणाच्या आदेशाने केला याबाबत तपास करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, मानिषाच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आलेल्या मीडियाला, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलीसांनी कोणाच्या आदेशाने रोखले, याप्रकरणातील सर्व आरोपींवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा तसेच केंद्र सरकारने देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी करावे आशा अनेक मागण्यांसाठी रमाई ब्रिगेड महिला संघटनेच्यावतीने मनिषा वाल्मिकी व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.
0 टिप्पण्या