मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून काही श्रीमंत मराठे प्रयत्नशील - ॲड. प्रकाश आंबेडकर
पाटणा
मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून काही श्रीमंत मराठे प्रयत्नशील असून अशा लोकांचा आम्ही निषेध करतो. राज्यातील मागासवर्गीय अधिकाऱ्यांची आरक्षणांतर्गत किती पद भरण्यात आले असून किती पद राहिली आहेत शिवाय किती मागासवर्गीय अधिकाऱ्यांना आरक्षणाच्या आधारे प्रमोशन देण्यात आले आहे, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे मागितली आहे. मात्र ही माहिती उपलब्ध असूनही महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात द्यायला तयार नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
निवडणुकीसंदर्भात ॲड. प्रकाश आंबेडकर हे सध्या बिहार मध्ये आहेत. मागासवर्गीय बाबत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना त्याचा जाहीर निषेध केला आहे. दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने एका समितीचे गठन केले असून ही समिती मागासवर्गीयांच्या आरक्षण संदर्भात माहिती घेणार आहे. असे असले तरी हा सर्व प्रकार फसवा असून मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून काही श्रीमंत मराठे प्रयत्नशील असल्याचा गंभीर आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राज्यातील सर्व मागासवर्गीय अधिकारी जे सध्या प्रमोशनच्या यादी मध्ये आहेत, त्या सर्वांना प्रकाश आंबेडकर यांनी विनंती केली आहे की आपण आपल्या कुटुंबासह सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन उभे करा, अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.
0 टिप्पण्या