मुंबई
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम युपीएससी परिक्षेवर मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे दिसून आले. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) पूर्वपरीक्षा पुणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात सुरळीत पार पडली. मुंबईत चार, तर नवी मुंबईत तीन परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. यात मुंबईतील शीव येथे असलेल्या डी. एस. हायस्कूलमध्ये एक परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक वर्गांमध्ये 24 विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली होती. मात्र, अनेक वर्गात अर्ध्याहून अधिक विद्यार्थी गैरहजर होते. काही परीक्षा केंद्रांवर यूपीएससीकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारच्या खबरदारी घेण्यात आल्या होत्या. विशेषतः कंटेंटोमेंट झोन मधून आलेल्या विद्यार्थ्यांची खास तपासणी करून त्यांना परीक्षेला स्वतंत्ररित्या आणि विशिष्ट अंतर ठेवून बसविण्यात आले असल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली.
मुंबईप्रमाणे पुण्यातही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची या परीक्षेला अनुपस्थिती होती, अशी माहिती पुण्यातील युनिक अॅकॅडमीचे केतन पाटील यांनी सांगितले. मुंबई आणि परिसरात विद्यार्थांना या परीक्षेसाठी लोकल, बेस्ट आणि एसटी बसची सोय उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता आले. यूपीएससीने परीक्षेपूर्वीच एक तास अगोदर उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचनांचे पालन झाल्याने बहुतांश विद्यार्थी आपल्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचले असल्याची माहिती युपीएससीच्या परीक्षेसाठी प्रशिक्षण देणाऱ्या लक्ष्य अकॅडमीचे पडवळ यांनी दिली.
मुंबईत ४ सप्टेंबर रोजी रेल्वेने तिन्ही महामार्गावर मेगाब्लॉक आयोजित करण्यात केला होता. मात्र, त्याचा कोणताही परिणाम परीक्षेवर झाला नाही. मेगाब्लॉक सुरू होण्यापूर्वीच युपीएससीचा पहिला पेपर तर दुसरा पेपर मेगाब्लॉक संपल्यानंतर संपणार होता. त्यामुळे याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली होती. सकाळी 9:30 ते 11:30 या वेळात या पूर्व परीक्षेचा पहिला पेपर झाला. हा पेपर जनरल स्टडीजवर आधारित होता. दुपारी 2 ते 30 पासून 4 वाजून 30 मिनिटापर्यंत दुसऱ्या पेपरची परीक्षा झाली. त्यात नागरी सेवा योग्यता चाचणी याविषयीचा पेपर होता.
0 टिप्पण्या