Top Post Ad

देशभरात उमटत असलेली जनतेची रिअॅक्शन योग्यच

देशभरात उमटत असलेली जनतेची रिअॅक्शन ही योग्यच - शरद पवार


मुंबई
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.  'मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार देशात कधी घडला नाही. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी कायदा हातात घेऊन टोकाची भूमिका घेतली. देशभरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी असे वागायला नको होते. देशभरात उमटत असलेली जनतेची रिअॅक्शन ही योग्यच असल्याचेही पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. 'उत्तर प्रदेश सरकारने पीडित तरुणीचा मृतदेह कुटुंबियांना का दिला नाही ? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या नेत्यांची तुम्ही अडवणूक का करता ? याचाच अर्थ उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आणि मूलभूत अधिकार याला काही अर्थ राहिला नाही. महाराष्ट्रात अशा घटना घडल्यावर तात्काळ अॅक्शन घेतली जाते. पण उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटना घडल्यानंतरही काहीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे', अशी टीकाही पवारांनी यावेळी केली.


हाथरस, बलरामपूरच्या घटना दुर्दैवी, महाराष्ट्रात हे सहन करणार नाही......मुख्यमंत्री
उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर या ठिकाणी महिलांवर बलात्कार होण्याच्या ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार काय कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तरीही सहन होणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा डिजिटल उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये जे घडले, महिलांवर अत्याचार, हे नाही सहन होणार! केवळ मिरा-भाईंदर नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत होता कामा नये की माझ्या माता-भगिनींकडे अत्याचार करण्याचं तर सोडाच पण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये, अशा पद्धतीचा कारभार मिरा-भाईंदरमध्ये पाहिजे.  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला म्हणायचे की दरारा आणि दहशत. पोलिसांचा असतो तो दरारा आणि गुंडांची असते ती दहशत. दहशत मोडून काढा, गुंडगिरी सुरु असेल तर ही दहशत मोडून काढली पाहिजे. या गुंडांसाठी पोलिसांचा दरारा पाहिजे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जे घडले यासोबतच ज्या पद्धतीची वक्तव्ये जिल्हा दंडाधिकारी आणि इतर करत आहेत त्यावरुन उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याचे सिद्ध होत असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. तसेच त्या म्हणाल्या की, देशात अराजकता माजली आहे. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये मुली या सुरक्षित नाहीत.यासोबतच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस येथे गेल्यानंतर त्यांच्यासोबत जसे वर्तन करण्यात आले. या बद्दल योगी आदित्यनाथ यांनी स्वतःची चूक मान्य करावी. गेल्या दोन दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याची चौकशी करण्याची विनंती मी पंतप्रधानांना करते. तसेच जर योगी सरकार हे राज्यातील महिलांची सुरक्षा करण्यास सक्षम नसेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


इच्छा असली की मार्ग मिळतो हे आपण ऐकलं होतं. पण इच्छाच नसेल तर समिती स्थापन केली जाते, अशा आशयाचं ट्विट करत अख्तर यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने हाथरस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. राज्यसभेचे माजी खासदार आणि प्रख्यात गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी नाव न घेता हाथरस प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.


उत्तर प्रदेशमध्ये हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. योगी सरकार हे प्रकरण बेजबाबदार आणि अमानवी पध्दतीने हातळत आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना द्यावा, अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्वीटकरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाची विनंती केली आहे. त्यांनी ट्विट केले की, 'देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती करतो.' असे ते म्हणाले आहेत.


शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटले की, ज्या लोकांनी अभिनेत्री कंगना रनोटचा बंगला पाडण्याच्या कारवाईवर त्यांच्या पक्षाचा विरोध केला होता. त्यांनी आता हाथरस येथील बकात्कार प्रकरणात त्या पीडित मुलीसाठी आवाज उठवायला हवा. त्यांनी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असलेले काँग्रेस नेता राहुल गांधींसोबत झालेल्या गैरवर्तनाचा निषेध केला आहे. 'ज्या लोकांनी एका अभिनेत्रीचे अवैध बांधकाम पाडण्याचा कारवाईचा विरोधात आवाज उठवला होता. त्यांनी हाथरस पीडितेसाठी न्याय मागितला पाहिजे.'


 



 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com