फुड कोर्ट, रेस्टॉरंट, बिअर बार आदी ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरु होण्याची शक्यता
मुंबई
फुड कोर्ट, रेस्टॉरंट, बिअर बार आदी ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र यासंदर्भातील नियमावली राज्याच्या पर्यटन विभागाकडून ३ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली आहे. त्यानुसार कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा. सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा. खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची ना हरकत घेण्यात यावी. संबंधीत आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करुन द्यावा. असे नियमावलीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
तसेच प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाची स्क्रिन टेस्ट अर्थात त्याच्या शरीराचे तापमानाची तपासणी करावी. • कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनाच आतमध्ये प्रवेश द्यावा. • ज्यांच्या शरीराचे तापमान ३८.० पेक्षा जास्त असणाऱ्या आणि फ्लुची लक्षणे असलेल्यांना प्रवेश देवू नये. तसेच प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाचा संपर्क नंबरची नोंद ठेवावी. जर असे कोणी लक्षणे असलेला व्यक्ती आला तर त्याला परत जाण्याचा सल्ला दयावा. • सेवा पुरविण्या अगोदर शाररीक अंतर पाळावे • ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग आणि प्रशासनाशी शेअर करण्यात येणार असल्याची आधी मान्यता घ्यावी. जेणेकरून कॉन्टक्ट ट्रेसिंगसाठी त्याने दिलेली माहिती उपयोगी येवू शकेल. • ग्राहकांना आत प्रवेश देताना सदर व्यक्तीने चेहऱ्यावर मास्क परिधान केलेला असणे बंधनकारक आहे. तसेच त्या आवारात असेपर्यत त्याने मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. • ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करून देणे सदर यंत्रणेला बंधनकारक आहे.
• शक्यतो ग्राहकांना डिजीटल पेमेंट करण्यास उद्योकत करावे. तसेच या सर्व गोष्टी करताना त्यांने जास्तीत जास्त काळजी यासाठी उद्युक्त करावे. • वॉशरूम, हात धुण्याची जागा सतत स्वच्छ कारावी तसेच त्याचे सॅनिटायझ करावे. कॅश काऊंटर आणि ग्राहकांचा संपर्क टाळायचा असेल तर काऊंटरवर शक्यतो दोघांच्या मध्ये काचेचा ग्लास बसवावा. • डिलीव्हरी ड्रायव्हर, आणि इतर कॉन्ट्रक्टर भेट देत असतील त्यांच्यासोबतचे संपर्क-संभाषण कर्मचाऱ्यांशी कमीत कमी ठेवावा. तसेच त्यांच्याकडून कोणतीही वस्तू किंवा माल मिळाल्यानंतर त्याची पोचपावती डिजीटल स्वरूपात द्यावी. शक्यतो एसी वापरण्याऐवजी मोकळी हवा त्या प्रिमायसीस मध्ये खेळती रहावी या उद्देशाने व्यवस्था करावी. • सीसीटीव्ही सारख्या गोष्टी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवावी. • पुरेशी मोकळी जागा असेल तर स्टाफला मास्क आणि हॅण्ड ग्लोव्हस घालण्यास बंधनकारक करावे.
• कॉन्टॅक्टलेस मेनू क्यू आर कोडचा वापर करून उपलब्ध करून द्यावा. • कापडी नॅपकीनचा वापर करण्याऐवजी चांगल्या दर्जाचे डिसपोजल नॅपकिन वापरावेत. • ग्राहकांना शक्यतो डिजीटल पेमेंट देण्यासाठी प्रोत्साहीत करावे. • बाटलीतील किंवा फिल्टर असलेले पाणी ग्राहकांना द्यावे. • ग्राहकांसाठी फक्त शिजवलेले अन्नच द्यावे तसेच थंड असलेले आणि फ्रिजमध्ये ठेवलेल्या अन्न मेनूमध्ये आणि ग्राहकांना देवू नये. • ग्राहकांसाठी असलेला भाग ग्राहक येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर सॅनिटायझ करावा. त्याचबरोबर तेथील टेबल, खुर्ची, कामाचे ठिकाण, बफेट टेबल आधी गोष्टी स्वच्छ आणि सॅनिटायझ करावेत. • बफेट सर्व्हिसला परवानगी नाही. • मनोरंजन आतमध्ये सुरु ठेवण्यास बंदी. • ग्राहकांची घेतलेली माहिती प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी. तसेच त्याचे रेकॉर्ड ३० दिवसापर्यत उपयोगात येवू शकते. त्याअनुषंगाने ती माहिती जपून ठेवावी.
सिनेमागृह आणि नाट्यगृह १५ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता
नवी दिल्ली:
तब्बल ७ महिन्यांपासून बंद असलेली सिनेमागृह आणि नाट्यगृह १५ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी एकूण क्षमतेच्या निम्म्या संख्येने प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येईल. याबद्दलच्या स्वतंत्र मार्गदर्शक सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जारी केल्या जातील. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक ५ साठी मार्गदर्शक सूत्र जारी केली आहेत. त्यानुसार लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत. सिनेमागृह, नाट्यगृह उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्यांनी आपापल्या स्थानिक परिस्थितीनुसार घेणे अपेक्षित आहे. अनलॉक ५ ची सूत्र आजपासून लागू करण्यात आली असून ती ३१ ऑकटोबरपर्यंत लागू असणार आहेत.
राज्यांना उचित वाटल्यास दि. १५ पासून शाळा, महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्था सुरू करता येणार आहेत. मात्र, ऑनलाईन शिक्षणाची सुविधा सुरूच ठेवण्यात यावी आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संस्थेत जाण्याऐवजी ऑनलाईन शिक्षण घ्यायचे असेल त्यांना त्यासाठी मुभा असावी. विद्यार्थ्यांवर उपस्थितीची सक्ती नसावी, असे निर्देश गृह मंत्रालयाने दिले आहेत.
व्यावसायिक प्रदर्शने आणि मेळावे यांना मुभा असेल. मात्र, त्यांच्या आयोजनासाठी व्यापार मंत्रालयाकडून जारी कारण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. खेळाडूंना प्रशिक्षण देणारे जलतरण तलाव दि. १५ पासून क्रीडा मंत्रालयाच्या सूचनांनुसार सुरू करता येतील. बागा, एंटरटेनमेंट पार्क्ससारखी ठिकाणे आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांच्या अधीन राहून उघडता येतील. नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर १०० जणांच्या मेळाव्यांना दि. १५ पासून मान्यता देण्यात आली आहे. ही संख्या राज्य आपल्या अखत्यारीत वाढवू शकतात. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या