अर्णब गोस्वामी प्रकरणात आत्यहत्या करणारी व्यक्ती मराठी व्यावसायिक होती
अर्णवचा पुळका का?
रिपब्लिक टीव्हीचा सर्वेसर्वा अर्णव गोस्वामीला अन्वय नाईकला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अलिबाग येथून अटक केली.या अटकेवर भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.वास्तविक अर्णव गोस्वामी हा भाजपच्या आश्रयाने मोठा झाला.भाजपच्या सत्तेत विरोधकांना एकेरी भाषेत ओरडून बोलणे ,टीका करणे ही कामे तो करीत होता.याचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेला आलेला आहेच.आता टीआरपी घोटाळ्यातही तो सापडण्याची शक्यता अधिक आहे.याचाच अर्थ भाजपच्या काळात तो मस्तीत वागत होता.आता हे नाईक प्रकरण गंभीर असंल्याशिवाय आणि अर्णवच्या विरोधात पुरावे मिळाल्याशिवाय पोलीस कारवाई करणार नाहीत.आता जे काही होईल ते कोर्टात पण या आधीच भाजप नेत्यांना अर्णवचा पुळका का येतो हे जनतेला कळले असेल.एकट्या अर्णवला अटक झाल्यावर आणीबाणीचा आरोप करणे योग्य आहे काय ?सत्ता गेल्याने सैरभैर झालेल्या भाजपने कंगना आणि अर्णव सारख्या लोकांना पाठींबा देऊन महाविकास आघाडी विरुद्ध मोर्चे उघडले होते पण आता दोघांच्याही डोक्यावर अटकेची टांगती तलवार असल्यामूळे भाजपला वाईट वाटणे शक्य आहे.
अरुण पां. खटावकर
लालबाग
------------------------------------------
त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही..
रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे.. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही..त्यामुळे अर्नब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही..
मे 2018 मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीर येथील वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती.. अर्नब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणे होती पण ती ते देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते.. गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती.. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प़करणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती..
त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प़करण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.. त्यानुसार अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली..या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही.. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही.. पत्रकारितेची झुल पांघरूण वाट्टेल तसे उद्योग करणारयांची पाठराखण मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करू शकत नाही.. कायद्याला त्याचे काम करू द्यावे हेच उचित ठरेल..
अर्नब गोस्वामी यांनी पत्रकारितेचे सर्व संकेत पायदळी तुडवले असून पत्रकारिता कशी नसावी याचा नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे.. त्यांची पत्रकारिता समर्थनीय नाही असे आम्हाला वाटते..
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष S. M. Deshmukh यांच्या वॉलवरून साभार...
-----------------------------------------------------------------------
महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी खलनायक
*जाता जाता* - अर्णब गोस्वामी याचे नाव एका आत्यहत्या प्रकरणात घेतले गेले आहे. आत्यहत्या करणारी व्यक्ती मराठी व्यावसायिक होती. *अर्णबला झालेली अटक ही पत्रकारितेवर झालेला हल्ला नाही.* त्यामुळे कुठलीही पत्रकार संघटना अर्णबच्या अटकेचा निषेध करणार नाही. भाजपने आपला विवेक शाबूत ठेवून, ते कोणाची बाजू घेत आहेत याचे भान ठेवायला हवे. बिहारी लोकांना खुश करण्याच्या नादात महाराष्ट्रातील पाया कमकुवत होत नाहीये ना, याचा त्यांनी विचार करावा.
अर्णबच्या सुटकेपर्यंत आम्ही काळ्या पट्ट्या बांधू- चंद्रकांत पाटील...... काळी पट्टी बांधण्यापेक्षा एवढी काळजी आहे तर चांगले वकील देवुन जामीनवर सोडवा हातरसमध्ये पिडीताच्या नातेवाईकांना कोणालाही भेटु दिले नाही. तेव्हा एकही बाहेर आले नव्हते. सगळे बिळात लपुन बसले होते आत्ता यांना 1977 ची आठवण झाली आहे
2018 मध्ये ही फाईल कोणी बंद केली होती ते सांगा
काळ्या पट्ट्या कशाला तोंडचं काळ करा की कोणी थांबणार नाही आपल्याला, आणि हो जर तुमच्या फडणवीस सरकारने त्याच वेळेस 2018 ला या मराठी ताईला न्याय मिळवून दिला असता तर आज तुम्ही विरोधात नसता, पण बर झालं हो तुम्ही मराठी माणसाच्या विरोधात आहात हे आपल्या अश्या वागण्यातून जनतेला कळते आहे , गल्ली पासून दिल्ली पर्यंत जळजळाट , जसे काय तर BJP च्या एखाद्याला अटक झाली आहे असे वागत आहे , सर पोलिसांना त्यांचे काम करू द्या जर आपल्याला आपली नामुष्की करून घायची नसेल तर शांत रहा सर ,
सुशांतच्या आत्महत्येमुळे आरडाओरड करणारे,अन्वय नाईक या मराठी माणसाच्या २०१८ साली केलेल्या आत्महत्येबद्दल तत्कालीन फङणविस सरकारने शांत राहुन केस दाबली होती..
आघाडी सरकारने कारवाई केली तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळे महाराष्ट्रद्रोही भाजपावाले बिळातुन बाहेर येउन बोलत आहेत म्हणजे हा भाजपाचा पिल्लु आहे हे सिद्ध झाल आहे........😡महाराष्ट्रद्रोही भाजपाचा जाहिर निषेध
छत्रपतींच्या नावाने निवडणुका जिंकता आणी त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रातील मराठी बाई विधवा होते तिला न्याय द्यायचं सोडून तिचा संसार उगड्यावर टाकून तिचं कुंकु पुसणाऱ्या पत्रकाराची बाजू घेताय, लाज वाटत पाहिजे...!
हे प्रकरण चौथ्या स्तंभाचं नाही, आत्महत्येचं आहे, कृपया गल्लत करू नका, उलट कायद्याच्या राज्यात कारवाई करायला पोलिसांनी एवढा उशीर का केला याचा जाब विचारा. भलेही मग तो कुणी का असेना.
तो मुळात पत्रकार नाही, पत्रकार वेगळे असतात. कुणी तरी पैसे घालून च्यानेल काढलं म्हणजे आणि त्यावर कुणाची तरी विकृत भुंकायची सोय झाली म्हणजे पत्रकार होत नाही. तो आत्महत्येचा भुरटा पण शातीर गुन्हेगार आहे.
एका कष्टकऱ्याचे पैसे बुडवून त्यानंच तयार केलेल्या स्टुडियोत बसून हा निर्लज्जपणे घाणेरडं किंचाळत होता, हा माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही.
त्याचा हा गुन्हा माहीत असूनही जे त्याच्या बाजूनं बूड आपटून आपटून रांडावपण आल्यागत विव्हळतायंत, ते लोक भारतीय संविधान, कायदे, सुव्यवस्था मान्य नसलेले देशद्रोही लोक आहेत असं खुशाल समजावं.
गुन्हा दाखल होऊन एवढा काळ झाला, तरी तो मोकाट का होता, हे पोलिसांनी सांगावं.
अरुणा नारायण गायकवाड
अहमदनगर
0 टिप्पण्या