मुज्जफर हुसेन यांच्या उमेदवारीला विरोध, ओबीसी-एससी-एनटी-मराठा व इतर समाजाला संधी देण्याची मागणी
ठाणे
राज्यपाल नियुक्त महाराष्ट्र राज्य विधान परिषदेची उमेदवारी देण्याबाबत मुज्जफर हुसेन यांच्या नावाला विरोध असून त्यांच्या व्यतिरिक्त ओ.बी.सी. एस.सी., एन.टी., मराठा व इतर समाजाला देण्याची मागणी ठाण्यातील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ.बी.सी विभाग उपाध्यक्ष सुरेश पाटीलखेडे यांनी पत्राद्वारे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहूल गांधी, पक्षाचे सरचिटणीस वेणू गोपाल तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना केली आहे.
आपल्या पत्रात त्यांनी मुज्जफर हसेन यांना आजपर्यंत पक्षाने दोनदा विधान परिषदेवर निवडून पाठविलेले आहे (MLC) आणि तिनवेळा भिवंडी मिराभाईंदर येथून विधान सभेची उमेदवारी सुध्दा दिलेली होती. त्यावेळी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. महाराष्ट्र प्रदेश कॉ. कमिटी कार्याध्यक्ष पदाची जबाबदारीही पक्ष नेतृत्वाने दिलेली आहे. असे असतानाही हुसेन यांच्या कार्यकाळात विशेषता कोकण विभागात (ठाणे - पालघर) जिल्हयात आज रोजी २४ पैकी एकही काँग्रेस पक्षाचा उमेदवार (आमदार) निवडून आलेला नाही, त्याचबरोबर एम.एल.सी., महापौर, नगराध्यक्ष, ए.पी.एम.सी. मार्केट कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती - सभापती तसेच व ग्रामपंचायतीचे सरपंच काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात निवडून आलेले नाहीत. हुसेन यांनी या परिसरातील काँग्रेस पक्षाची संपूर्ण वाताहात केली असल्याचा आरोपही पाटीलखेडे यांनी पत्रात केला आहे..
गेली चाळीस वर्ष (१९८० ते २०२०) कोकण विभागामध्ये विधान परिषदेची उमेदवारी देताना म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. ओ.आर.अंतुले साहेब असतांना पासून फक्त नी फक्त आज पर्यंत मुस्लीम समाजाच्या उमेदवारालाच उमेदवारी देण्यात आलेले आहे. परतु काेकण विभागामध्ये ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्हयाचा समावेश आहे. या विभागामध्ये विशेष म्हणजे ओ.बी.सी. समाजाचे प्राबल्य मोठया प्रमाणात आहे. त्यानंतर मराठा, एस.सी., एस.टी., एन.टी. आणि इतर समाजाचा समावेश आहे. तसेच कोकण विभागात मुंबई वगळता ३६ विधान सभेच्या आणि ७ लोक सभेच्या त्याच बरोबर एक शिक्षक मतदार संघ, एक पदविधर मतदार संघ त्याचबरोबर एक स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींचा मतदार संघ अशा तीन एम.एल.सी. आहेत.
मुज्जफर हुसेन गडगंज संपत्तीच्या जोरावर ठराविक प्रदेश नेतृत्वातील नेत्यांना त्यांची किंमत चुकवून आपल्यासाठी काम करण्यास भाग पाडत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य कोकण विभागासाठी राज्यात मा. बी. एम. संदिप (चिटणीस) ए.आय.सी.सी.हे निरिक्षक म्हणून चार वर्षा पूर्वी पासून कार्यरत ठेवलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात देखील लोकसभा, विधानसभा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडलेल्या आहेत. परंतु ठाणे व पालघर जिल्हयात एकही आमदार निवडून आलेला नाही. यावरून हुसेन यांचे जनसामान्य लोकांमध्ये काहीही स्थान नाही. केवळ पैश्याच्या जोरावर राज्याचे नेतृत्व त्यांना सहकार्य करीत असल्याचे सर्वसामान्य काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मत झालेले असल्याचे खेडेपाटील यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मुज्जफर हुसेन यांना महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात येऊ नये. त्या ऐवजी एखादया सक्षम व पक्ष विस्तार करणाऱ्या बहुजन ओ.बी.सी. उमेदवाराचा अवश्य विचार करावा अशी मागणी सुरेश खेडेपाटील यांनी पक्षाला केली आहे.
0 टिप्पण्या