Top Post Ad

आदिवासींना त्यांचे हक्क व अधिकार मिळण्याकरिता नायब तहसिलदार यांचे मोलाचे सहकार्य

तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली  
नायब तहसिलदार नरेश पेडवी यांचे आदिवासी बांधवांना मोलाचे सहकार्य !


आदिवासींना त्यांचे हक्क व अधिकार मिळण्यास होणार मदत. 



उरण
आदिवासी कातकरी  समाज हा नेहमीच विविध शासकीय सेवा-योजनांपासून वंचित राहिला आहे. म्हणूनच शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयानुसार आदिवासी समाजातील कातकरी आणि माडी गोंड ह्या अनुसूचित प्रवर्गातील जाती प्रामुख्याने विकसित होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेवून उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेले वर्ष भर उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी बहुतांश वाड्यांवर कागद पत्रांची पूर्तता याबाबत  सतत पाठ पुरावा केल्यामुळे  तहसीलदार भाऊसाहेब अंधारे  यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात प्रथम रेशन कार्ड वाटप त्यानंतर आवश्यक ईतर कार्ड , दाखले याचे वाटप टप्प्याटप्प्याने करण्यात येईल असा अँक्शन प्लॅन ठरला आहे. 
           रेशन कार्ड बनवण्यासाठी धान्य पुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी  नायब तहसिलदार नरेश पेडवी यांनी विशेष लक्ष देवून युद्ध पातळीवर कामास सुरुवात केली. त्यांच्या पुरवठा विभागातील अधिकारी सौ गोरेगावकर मॅडम,  बिरासदर सर , ललिता म्हात्रे, विलास पाटील यांनी अहोरात्र मेहनत घेवून नवीन रेशन कार्ड तयार करून जवळ जवळ 50% वाड्यांवरिल रेशन कार्ड नायब तहसिलदार मालती घरत मॅडम यांच्या हस्ते वाटप देखील केले. राहिलेल्या वाडी वरील रेशन कार्ड लवकरच बनवून मिळतील. त्याची सर्व प्रक्रिया सुरू आहे. नरेश पेडवी यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच हे शक्य झाले आहे. त्यांचा आदिवासी बांधवांसाठी असलेला जिव्हाळा पाहून सर्वांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे .त्यांनी स्वतः सर्व रेशन दुकानदार यांना आदेश दीले आहेत की आदिवासी बांधवांना शासनाकडून आलेले त्यांच्या वाट्याचे धान्य व्यवस्थितपणे वाटप करावे कोणतीही फसवा फसवी करू नये. त्यांच्या ह्या सहकार्यामुळे आदिवासी समाजासाठी असलेल्या सर्व योजना लवकरात लवकर मिळण्यास सुरुवात होईल अशी सर्वांना अपेक्षा आणि विश्वासही वाटत आहे.



        गट विकास अधिकारी गाडे मॅडम यांनी देखील सकारात्मक पाऊल उचलून तातडीने सर्व ग्राम सेवकांची एक मीटिंग दिनांक 18/11/2020 रोजी आयोजित केली आहे. व त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ कसा आदिवासी बांधवांना  देता येईल यावर चर्चा होणार आहे. तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि नायब तहसीलदार नरेश पेडवी यांनी  केलेल्या सकारात्मक कार्याचे  सर्व आदिवासी बांधवांकडून कौतुक होत आहे. हे सर्व करत असताना उरण तालुक्यातील सर्व आदिवासी प्रतिनिधी मनीष कातकरी डाउर नगर कातकरी वाडी, रोशन कातकरी केल्याचा माळ, अनिल पवार चिंच पाडा, अनिल भगत सरपंच रान सई, नर्मदा दोरे सदस्य बंगल्याची वाडी, सुरेश पारधी उपसरपंच रानसई, बेबी बई कोप्रोली वाडी, भारती कातकरी बेलवाडी सारडे, सत्यवान कातकरी पूणाडे वाडी, मालू ताई, सुनंदा वाघमारे विंधणे वाडी, सुनील नाईक जांभूळ पाडा कातकरी वाडी,ताई वाघमारे-चांदेल वाडी, परशुराम कातकरी वेश्वी कातकरी वाडी आणि अन्य आदिवासी कार्यकर्ते यांनी खुप मेहनत घेतली.
       उरण सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुधाकर पाटील, सचिव संतोष पवार, उपाध्यक्ष रुपेश पाटील, प्रा राजेंद्र मढवी सर आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जोशी आणि नामदेव ठाकूर आदी  सामाजिक कार्यकर्ते आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्याच्या कर्तव्य भावनेने कसोशीने प्रयत्न करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com