Top Post Ad

देहुरोड बुद्धविहारावर अज्ञातांकडून हल्ला, बांधकाम साहित्याची मोडतोड 

देहुरोड धम्म भूमीवर अज्ञातांकडून हल्ला, बांधकाम साहित्याची मोडतोड 



                     
 देहुरोड -
येथील ऐतिहासिक वारसा असलेली धम्मभुमी  बुध्द विहारावर लष्करी जंवानानी बेकायदेशिर भ्याड हल्ला करुन बांधकाम साहित्याची मोडतोड,विहारा समोरील फलकांची मोड तोड  केल्याने बौध्द समाजा सह सर्व धर्मीय आंबेडकरी जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे. या घटनेची माहिती कळताच पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त आनंद भोईटे ,देहुरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील आदि अधिकार्यांनी धम्म भूमीला भेट देऊन लष्करी जवानांनी मद्य धुंद अवस्थेत केलेल्या नंगा नाचाची पाहणी केली. लष्करी जवानानी केलेल्या निंद्य कृत्याची तक्रार  बुध्द विहार कृती समितीचे अध्यक्ष टेक्सास गायकवाड़ यांनी देहुरोड पोलिस ठाण्यात केली आहे .त्या तक्रारीत कायदा सुव्यवस्थेला व देशाच्या एकात्मेला सुरूंग लावणार्या संबंधित अज्ञात जंवानावर फौजदारी गुन्हे दाखल करा. देहुरोडचे लष्करी प्रमुख ब्रिगेडियर संजय खन्ना,देहुरोड लष्करी मुख्यालय प्रमुख कर्नल चित्रण.देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांच्या आदेशान्वेयेच अज्ञात लष्करी  जंवानांनी बेकायदेशीर निंद्य कृत्य केल्याने तिघांवर अट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याचे तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.                      


देहुरोड पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवड,  यांनी   लष्करी जंवानानी केलेल्या मोडतीडीचा पंचनामा केला. या संबधी गायकवाड यांनी सांगितले  की  देहुरोड कँन्टोमेंन्ट बोर्डाने दि.२७ ऑक्टोबर रोजी बुध्दविहारात चालेले बांधकाम थांबविण्याचे सुचना पत्र मिळल्यापासुन बांधकाम बंद केले होते. असे असतांना 2 नोव्हेंबर रोजी बुध्द विहार कृती समितीच्या मालकी वहिवाटी जागेत अज्ञात लष्करी जंवानानी पाहाटे ३:३० ला येऊन बांधकामाचे कॉलम,विहारा समोरचे फलक,सुचना फलकाची मोड तोड  करुन साहित्याची नुकसान केले आहे. लष्करी जवान एवढा उन्मात करुन  थांबले नाही तर त्यांनी  विहारा समोरील  विश्व रत्न डाँःबाबा साहेब आंबेडरांचा नावाचा फलक फाडला. दोन लोखंडी गजाचे  सांगडे पुर्ण पणे वाकवले तसेच बसण्यासाठी खुर्च्यांची मोड-तोड करून शेजारी असलेल्या पाण्यात फेकुन दिले. व विहाराचे नळ पाणी पुरवठा पाईपाचे टुकडे टुकडे केले ,पिण्याच्या  पाण्याची टाकी ही तोडले, जाताना  दोन टन स्टिल ही लष्करी वहानातुन घेऊन गेले. लष्करी जंवानानी हा निंद्य कृत्य करुन तमाम आंबेडकरी जनतेची मने लष्करा विरुध्द भडकावण्याचा व  कायदा सुव्यवस्था भंग करण्याचा कृत्य केला आहे. अशी माहिती गायकवाड यांनी दिली.


महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला कायद्य्याचा भंग करुन बाबासाहेबांनी निर्माण केलेलेल्या तसेच कायदेशिर असलेल्यां धम्म भुमीत देशाला अभिमान असणार्या अज्ञात लष्करी जवांनानी निंद्य कृत्य केले.या घटने बद्दल ह्युमन राईटस जस्टिस असोसिएशनचे राष्ट्रिय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांनी संताप व्यक्त केला. मध्य रात्री अज्ञात लष्करी जंवानानी धम्म भुमीवर हल्ला करणे म्हणजे  देहुरोड चे लष्कर प्रमुख ब्रिगेडियर संजय खन्ना ,देहुरोड लष्करी मुख्यालय प्रमुख कर्नल चित्रण यांचा लष्करी जवाना वर नियंत्रण नाही. हे स्पष्ट होत आहे , या बद्दल राष्ट्रपती व संरक्षण मंत्री यांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन पाठविण्यात येणार असल्याचे तनवीर मुजावर यांनी सांगितले या वेळी पुणे जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे, मावळ तालुका अध्यक्ष रज्जाक शेख,धम्मभूमि सुरक्षा समितीचे मंदाकिनीताई भोसले, धम्मभूमी कृति समिती चे उपाध्यक्ष धर्मपाल  तंतरपाळे, सरचिटणीस अशोक गायकवाड,प्रवक्ते डॉ किर्तीपाल गायकवाड, रंजनाताई सोनवणे धम्म भूमी सुरक्षा समिती चे अध्यक्ष अरुण जगताप आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com