ठाणे महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण जनजागृतीपर जिंगल स्पर्धेचे आयोजन
स्पर्धेत सहभागी होण्याचे महापौर, आयुक्तांचे आवाहन
ठाणे
केंद्र शासनाने जाहिर केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 'स्वच्छ सर्वेक्षण २०२१' मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेबाबत नागरिकांमध्ये स्वच्छता मोहिमेबाबत जनजागृती करण्याकरिता तसेच या अभियानामध्ये शहरातील नागरिक, विद्यार्थी, कलाकार, सामाजिक संस्था इत्यादींना सहभागी करुन घेण्यासाठी 'स्वच्छ सर्वेक्षण २०२१' जनजागृतीपर जिंगल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिक, विद्यार्थी, कलाकार तसेच सामाजिक संस्था यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे. दरम्यान विजेत्या स्पर्धकांची जिंगल स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या जनजागृती मोहिमेकरिता वापरण्यात येणार असून विजेत्यांना रोख पारितोषिक देवून गौरविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत स्वच्छतेबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याकरिता 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' जिंगल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून जिंगल स्पर्धेमध्ये शहरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, कलाकार, सामाजिक संस्था यांना सहभागी होता येणार आहे. विजेत्या स्पर्धकांची जिंगल स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या जनजागृती मोहिमेकरिता वापरण्यात येणार असून विजेत्यांना रोख पारितोषिक देवून गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक रु.5 हजार व प्रशस्तीपत्र, द्वितीय पारितोषिक रु. 3 हजार, तृतीय पारितोषिक हजार तसेच प्रत्येकी १ हजार रुपयांची ५ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेमध्ये सहभागी होणेकरीता स्पर्धकांना स्वच्छतेबाबत जनजागृतीपर जिंगल पाठविणे बंधनकारक असून जिंगल संहिता स्वलिखीत अथवा संबंधीत लेखकाची परवानगी घेतलेली असावी. जिंगल योग्यरित्या तयार करुन publicrelationtmc@gmail.com ईमेलवर दिनांक १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत महापालिकेकडे करणे बंधनकारक राहणार असून स्पर्धेसाठी कमीतकमी 10 सेकंद ते जास्तीत 30 सेकंदाची जिंगल पाठविण्यात यावी. स्पर्धेसाठी परिक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून तो सर्वांवर बंधनकारक राहणार आहे. सदर स्पर्धेच्या अटी व शर्थी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तरी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ जनजागृतीपर जिंगल स्पर्धेचे ठाणेकरांनी सहभागी होण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या