Top Post Ad

नाका कामगार भगिनींना भाऊबीज भेट

एक आगळी वेगळी भाऊबीज भेट, मास्क आणि दिवाळी फराळ



ठाणे
शास्त्री नगर नाक्यावर काम मिळेल काय या अपेक्षेने जमणारे बांधकामासाठी लागणाऱ्या मजुरांचे तांडे दिवसेंदिवस आजही वाढत आहेत. गेली सात आठ महिने काम मिळाले नाही गरिबीत दिवस काढणारे  नाका कामगार बांधकाम ठेकेदाराच्या  प्रतीक्षेत पोटाची खळगी भरण्याच्या प्रतीक्षेत आजही आहेत. नेहमीच असतातही. सकाळी आठ वाजल्यापासून जमा व्हायला सुरुवात होते ती दहा वाजेपर्यंत. या वर्षी वेगळ्या पद्धतीने या नाका कामगार भगिनींसोबत  भाऊबीज झाली. प्रत्येक भगिनींच्या हातावर सॅनिटायझर आणि प्रत्येक भगिनींना मास्क वाटण्यात आले तदनंतर सोशल डिस्टनसिंगचा अवलंब करीत सुमारे 150 भगिनींना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम ठाणे परिवहन समितीचे अध्यक्ष विलास जोशी व  ठाणे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस  भास्करराव गव्हाळे यांचे शुभ हस्ते पार पडला.


पोटापाण्यासाठी गांव सोडलेल्या नात्याच कोणीच नसलेल्या या विस्तीर्ण यांत्रिकी शहरात नातं जपणारी शिकवण, संस्कृती चालू रहावी  याचे प्रयत्न करणारी ही मोजकी मंडळी. या कष्टकरी गोरगरीब महिलांनाही दिवाळी सणाचा आनंद घेता यावा म्हणून आज भाऊबीजेच्या दिवशी (मास्क -२ ब्लाउजपीस आणि फराळाचे  पाकिट (२लाडू, २ करंज्या, 2 चकल्या, चिवडा ,  शंकरपाळ्या, )या महिलांना वाटून एक आगळी वेगळी भाउबिज साजरी करुन या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा हा छोटेखानी प्रयत्न.
मिलिंद सरदेशमुख,प्रसाद ठकार ,गणेश बकशेट्टी, कविता ठोंबरे, समर्थ बकशेट्टी  गेली सहा वर्ष हे काम अविरतपणे करुन यावर्षीही एक आगळी- वेगळी भाऊबीज सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून आज साजरी केली. या कार्यक्रमासाठी सागर यादव, गणेश यादव यांची मोलाची मदत झाली



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com