Top Post Ad

हॉट स्पॉट असलेल्या प्रभागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास केली सुरुवात

हॉट स्पॉट असलेल्या प्रभागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास केली सुरुवात



ठाणे :
ठाणे  महापालिका हद्दीत आदल्यादिवशी १६० रुग्णांची नोंद झाली होती तर काल नऊ रूग्ण वाढून 169 रुग्णांची नोंद झाली आहे. दिवाळी सणासाठी खरेदी करण्यासाठी ठाणेकर मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत, बाजारपेठा भरून गेल्या आहेत. फिजीकल डिस्टंन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाचा हॉट स्पॉट असलेल्या प्रभागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. सर्वात जास्त ४५ रूग्ण माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये सापडले आहेत. २४ रुग्ण वर्तकनगरमध्ये तर उथळसर आणि कळवा प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी २२ रुग्णांची नोंद झाली आहे. नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात १७ रूग्ण वाढले आहेत. लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती येथे १३ रुग्णांची भर पडली आहे. दिवा प्रभाग समितीमध्ये १० रूग्ण आढळून आले आहेत. वागळे प्रभाग समितीमध्ये नऊ तर सर्वात कमी एक रूग्ण मुंब्रा प्रभाग समितीमध्ये मिळून आला आहे. सहा रुग्णांचा पत्ता मिळाला नाही.


विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 164 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला असून आत्तापर्यंत ४५ हजार ८५९ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. एक हजार ४७३ रुग्णांवर घरी आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत एक हजार १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महापालिका हद्दीत काल सहा हजार पाच नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये १६९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मिळाले आहेत. आत्तापर्यंत पाच लाख ६० हजार 965 नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन ठाणे महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 


 दरम्यान ठाणे शहरातील नागरिकांच्या शरिरात अँटीबॉडीजचे प्रमाण किती टक्के आहे हे तपासण्यासाठी दिवाळीनंतर सेरो सर्व्हे विचाराधीन असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली आहे. ठाण्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महत्वाच्या तीन प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा सर्व्हे केला जाणार आहे. या सर्व्हेमुळे शरिरात अँटीबॉडीजचे प्रमाण किती टक्के आहे याचा अंदाज येणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत पाच लाख 60 हजार 965 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यात आतापर्यंत 46 हजार 795 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 8.34 टक्के आहे. यापुर्वी ते दहा टक्क्यांच्या आसपास होते. याशिवाय, आठवड्याचा रुग्ण वाढीचा वेग ०.३० टक्के आहे.




ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यामुळे शहरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी आल्याने शहरात अँटीबॉडीजचे प्रमाण किती आहे हे तपासून घेण्यासाठी दिवाळीनंतर सेरो सर्व्हे करण्याच्या विचार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी माहिती दिली आहे.मुंबईमध्ये ज्या संस्थेने हा सर्व्हे केला आहे त्याच संस्थेच्या माध्यमातून हा सर्व्हे करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.


 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com