रिपब्लिकन चळवळ ही एक आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाची राजकीय ताकत आहे. रिपब्लिकन पक्षाची आंबेडकरी चळवळीशी डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक बैठकीवर ठाम असणारी असल्यामुळे व देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकिय प्रक्रियामधुन ताऊन सुलाखुण निघालेली ही चळवळ असल्यामुळे तसेच आपल्या देशांमध्ये आंबेडकरी विचाराचा कुटुंबामध्ये जन्मलेल्या पैकी जास्तीत जास्त लोक मूलतः प्रजेची सत्ता आणणारा आंबेडकरी विचारधारा जोपासणारा रिपब्लिकन राष्ट्रवाद मांडणारा असतो व तो मनातुन रिपब्लिकन असतो. इतर राजकिय लोक असे बोलतात जन्माने सभासद मिळणारा एकमेव पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष.
अनेक वेळा अनेक संवादात तो बोलतो
'जय भीम के नारे पे खुन बहे तो बहने दो '!
' एकटा राहीलोतरी निळा झेंडा सोडणार नाही!
अशा अनेक गगनभेदी घोषणांनी या चळवळीचे ऊर भरून येते व डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर कोणत्याही ताकतीनिशी लढण्यासाठीची ताकद येते. आज कितीही गटांमध्ये आपला रिपब्लिकन पक्ष असला तरी डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेच्या प्रश्नांवर व समुदायाच्या मुलभुत प्रश्नांवर एकत्र येणारा हा आपण पाहीला आहे. त्यामुळे रिपब्लिकन चळवळ संपु शकत नाही किंवा भवितव्य नाही असं होऊ शकत नाही. राजकिय यश किती येईल हे सांगता येत नाही पण चळवळीची दाहकता ना संपू शकत नाही किंबहुना भविष्यामध्ये काळाची पावले ओळखून कार्यपद्धती व प्रक्रियामध्ये चळवळीचेच पण प्रशिक्षित नेते व कार्यकर्ते यांची शिस्तबद्ध संघटन महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ताकतीने उभे राहिल.
प्रामाणिक व हुशार मानसांचच काम आहे राजकारण व समाजकारण. पण एखादी व्यक्ती हुशारीने बैमानी व प्रामाणिकपणाने वागुन हुशार लोकांचे नेतृत्त्व करत असेल तर आपण समजून घेतले पाहिजे,की हे खरंच समाज हिताचे आहे का? प्रामाणिक व हुशार मानसांना जर राजकारण व समाजकारण करायचे असेल तर त्यांनी आपले कार्यक्षेत्र ठरवले पाहिजे, की जे कार्यक्षेत्र आपल्या आवाक्यातील आहे, भले तो एखादी वस्ती, गाव, शाखा, वार्ड किंवा एखादा मतदारसंघ असो. एक भरीव क्रुती कार्यक्रम देऊन आपल्या समविचारी सहकार्यांबरोबर काम करुन स्वतः सहभागी होऊन जनतेला रिझल्ट देणारं काम केले पाहिजे.नाहीतर काही हुशार व प्रामाणिक लोक सोशल मिडीयावर सल्ले देतात व स्वतः काही करत नाहीत व बोलतात हुशार मानसांच कोण ऐकत नाही. अशा लोकांनी कथणी व करणी मध्ये समन्वय करुन रिझल्ट दिला पाहिजे तरच लोक त्यांचे ऐकतील.
आपल्याकडे प्लानर /नियोजनकर्ते खुप आहेत व इम्पलीमेंटर/ अंमलबजावणी करणारे कमी आहेत. मला वाटते भान ठेऊन नियोजन करणारे कमी असतील तरी चालेल पण बेभान होऊन नियमानुसार अंमलबजावणी करणारे खुप हवेत. नाहीतर काही विद्वान रणनीती आखतात व अंमलबजावणी करण्यासाठी समाजाने ,चळवळीने व विषय दुर्बल घटनांचा असेल तर रिपब्लिकन पक्षाने हे करावे व ते करावे असे म्हणून सदर रणनितीपासुन स्वतःला अलिप्त ठेऊन काही होत नाही असे बोलतात मात्र अपेक्षित असे असावे की सदर रणनितीकारांनी हुशारीने व प्रामाणिक पणाने जी लोंक व यंत्रणा अंमलबजावणी करणार आहे त्यांची ताकद, तयारी बघुन त्यांच्या बरोबर बसुन अंमलबजावणीचे नियोजन करावे. समाजाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी हुशार व प्रामाणिक माणसांचीच फार गरज आहे व राहणार सुद्धा. पण आपण ज्यानां हुशार व प्रामाणिक समजतो ते खरंच हुशार व प्रामाणिक आहेत हेच समजायला बराच वेळ घालवला तर पुढे अडचण होते, म्हणून डोळसपणाने विचार करुन प्रामाणिक व हुशार मानसांनी जर राजकारण व समाजकारण केले तर त्याचे दुरगामी परिणाम पाहायला नक्की मिळतील. तरी प्रामाणिक व हुशार मानसांनी नकारात्मक विचार न करता सक्रिय होऊन राजकारण व समाजकारण करत राहिले पाहिजे.
- प्रविण मोरे.. 88504 46061
0 टिप्पण्या