फक्त बामण पुरुषांना वेद शिकविणाऱ्या पुण्यातील वेद भवनला २० लाखांची देणगी
वेद भवन ही संस्था फक्त बामण पुरुषांना वेद शिकविण्याचे काम करते. हिंदु धर्मातील ब्राम्हणेतर म्हणजे शूद्रांना (OBCs) आणि स्त्रियांना वेद पठणाचा या ठिकाणी अधिकार नाही. या संस्थेचा कार्यक्रम मनुस्मृती या ग्रंथावर आधारित आहे. वेदांच्या नावाखाली येथे सनातन वैदिक धर्मविचार शिकविला जातो. जो व्यवहारात पुरोहित वर्गाच्या हातातील शोषणाचे यंत्र बनतो.
महाराष्ट्रात सनातनी ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांच्या माता-पित्याला धर्माच्या नावाखाली आत्महत्येला प्रवृत्त केले होते. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या भावंडाचा छळ केला होता. संत तुकारामांची हत्या केली होती. वेदांवर अधिकार सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला गेला. शाहू महाराजांना छळले. इतके की टिळकांसारखा पुढारी त्यांच्या मागे लावला. अशा या महाराष्ट्रात सगळ्यांच्या नाकावर टिच्चून राज्यपाल वेदभवनाला देणगी जाहीर करतात, हे भयसुचक आहे. हा जात्यंध आणि धर्मांध माणूस घटनात्मक पदावर बसण्याच्या लायकीचा नाही, हे गेल्या वर्षभरात वारंवार सिद्ध झाले आहे. या घटनेने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
चंद्रभान आझाद
0 टिप्पण्या