ठाण्यातील रामनगर येथील लुम्बिनी बुद्ध विहारात धर्मांतराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केरळ राज्यांतील ठाणे येथे रहात असलेल्या एका समाजसेवी कुटुंबाने आपल्या मित्रासह धम्मदिक्षा ग्रहण केली. मागील अनेक वर्षापासून हे कुटुंब आपल्या धर्म परिवर्तनाबाबत अनेक बौद्ध सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते. या कालावधीत या कुटुंबाचा मोठा मुलाचेही निधन झाले. त्याच्या पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगीच या कुटुंबाने भदन्त शिलकिर्ती यांच्याकडून धम्ममय वातावरणात बावीस प्रतिज्ञासह धम्मदिक्षा ग्रहण केली. थोपील शिबु सुमांगला हरिदेवण यांनी आपली पत्नी सरिता, मुलगी सितारा, मुलगा सागर राज व साराराज यांच्यासह बौद्ध धम्माचा स्विकार केला. तसेच विटावा येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्राबाबू नायर यांनीही धम्मदिक्षा घेतली. ठाण्यात सुरु असलेली सामाजिक बांधिलकी या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा (अध्यक्ष: राजरत्न आंबेडकर) यांच्यावतीने मंगला बिरारे व यशवंत बिरारे यांनी दिक्षार्थींना धम्मदिक्षा प्रमाणपत्र दिले.
काही दिवसापूर्वीच २४ नोव्हेंबर रोजी उत्तरप्रदेश मधील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर / लव्ह जिहादवर चर्चा झाल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर झाला असून लव्ह जिहादच्या कायद्यास मान्यता देण्यात आली आहे. हा अध्यादेश राज्यपालांना पाठवून परवानगी घेतली जाईल. राज्यपालांच्या परवानगीनंतर धर्मांतर कायदा अस्तित्वात येईल. फसवणूक, लोभ, जबरदस्ती किंवा इतर फसवणुकीने लग्न करणे म्हणजे दुसर्या धर्मात बदल करणे हा गुन्हा असेल. सामूहिक धर्मांतर झाल्यास सामाजिक संस्थांची नोंदणी रद्द केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाणार. या प्रकरणी दोषीला 1 ते 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद तसेत 15,000 दंड. महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या प्रकरणात 3 ते 10 वर्षांपर्यंतची शिक्षा तसेच 25000 दंड आकारला जाईल. धर्म परिवर्तन करण्यासाठी 2 महिने आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल. याचं उल्लंघन केल्याबद्दल 6 महिने ते 3 वर्षे शिक्षा तसेच 10000 दंड होईल. अशा पद्धतीने धर्म परिवर्तन रोखण्यासाठी कायदे करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच हा धर्मांतर सोहळा ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या