उरण शिवसेना शहर शाखेतर्फे मोफत मास्कचे वाटप.
उरण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोरोना महामारीतून काळजी घेताना पुन्हा एकदा जनतेसमोर "माझे कुटुंब माझी जबाबदारी " ही संकल्पना मांडली माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेनुसार सामाजिक बांधिलकी जपत, कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय व जनजागृतीचा एक भाग म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या शुभ हस्ते मोफत मास्कचे वाटप करण्यात आल्याची माहिती आयोजक गणेश शिंदे-माजी नगराध्यक्ष तथा उरण नगर परिषदेचे गटनेते यांनी दिली. शिवसेना उरण शहर शाखेतर्फे शहरातील सर्व प्रभागातील नागरिकांना सोशल, फिसिकल डिस्टन्सचे नियम पाळत मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी दिनेश पाटील विश्वस्त JNPT, नरेश रहाळकर-उपजिल्हा प्रमुख, संतोष ठाकूर -तालुका प्रमुख, बी एन डाकी -तालुका संघटक, जे पी म्हात्रे-तालुका संपर्क प्रमुख, विजय भोईर -जिल्हा परिषद सदस्य,हिराजी घरत-पंचायत समिती सदस्य, महादेव घरत -कामगार नेते, रमेश म्हात्रे -कक्ष जिल्हा प्रमुख, कौशिक ठाकूर -कार्याध्यक्ष शिक्षक सेना, चेतन म्हात्रे -तालुकाध्यक्ष अवजड वाहतूक सेना, नितेश पाटील-युवा सेना,ममता पाटील -उपजिल्हा संघटक, ज्योती म्हात्रे -विधानसभा संघटक, भावना म्हात्रे -तालुका संघटिका, प्रणिता म्हात्रे -तालुका संपर्क संघटिका,धीरज बुंदे -उरण तालुका ग्राहक कक्ष प्रमुख, विनोद म्हात्रे -शहर प्रमुख,गणेश म्हात्रे -शहर संपर्क प्रमुख, अतुल ठाकूर -नगरसेवक, वर्षा पाठारे नगरसेविका, समीर मुकरी नगरसेवक, विद्या म्हात्रे नगरसेविका, सुजाता गायकवाड, उपशहरप्रमुख अरविंद पाटील, गणेश पाटील, कैलास पाटील, सरपंच बळीराम ठाकूर, संदीप चव्हाण, नयन भोईर आदी शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या