जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी प्रशासन सज्ज
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा
ठाणे
ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पुर्वतयारी करण्यात आली असुन यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज आहे. तसेच पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.लस उपलब्धता झाल्यानंतर तातडीने मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित कोरोना लसीकरण टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, डॉ. विनायक जळगावकर, जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात सुमारे ८५० लसीकरण केंद्र असणार आहेत. दर दिवशी १०० लस देणार आहेत. यानुसार एका दिवशी ८,५०० जणांना लस देण्यात येईल. यापद्धतीने नियोजन करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. कोरोनाची लस येताच योग्य त्या तापमानात ठेवून ही लस लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल. ग्रामीण भागातही या लसचं वितरण करण्यात येणार आहे. या लसची साठवणूक, त्याचे नियंत्रण व वितरणाच्या वेगवेगळ्या टप्याबाबतची तयारी पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले .
लसीकरणासाठी शीतसाखळी तयार करण्यात आली आहे. या शीतसाखळीत प्लस दोन ते प्लस आठ डिग्री सेल्सिअस तापमानात ही लस ठेवण्यात येणार. ही लस ठेवण्यासाठी आईसलाईंड रेफ्रिजरेटर (आयएलआर) तयार ठेवण्यात आले आहेत. या आयएलआरचं तापमान दोन ते आठ डिग्री सेल्सिअस एवढं असून त्यात लस ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात १९० आयएलआर आहेत. जिल्ह्यात १९७ डिपफ्रीजरची व्यवस्था आहे. तसेच एकुण कोल्ड बॉक्स १९९ आहेत.तसेच २६५३० आईस पॅक उपलब्ध आहेत. या बरोबरच जिल्ह्यात ४८१४ वँक्सिन कँरियर असणार आहेत. जिल्ह्यात ८४६ क्सिनेटर, ३४० पर्यवेक्षक असणार आहेत. जिल्हयात 66 हजार 447 जणांनी लसिकरणासाठी नोंदणी केली आहे.
नोंदणीकृत व्यक्तींनी लसीकरण बूथवर उपस्थिती नोंदविल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी प्रवेशावेळी केली जाईल. यानंतर बूथवर नियुक्त अधिकारी ओळखपत्र व अन्य पडताळणी करतील. यानंतर संबंधितांना प्रतीक्षा कक्ष (वेटिंग रूम) येथे बसविले जाईल. शारीरीक अंतर ठेवताना क्रमांकानुसार नागरिकांना लसीकरण कक्षात (व्हॅक्सिनेशन रूम) सोडले जाईल. तेथे लसीकरणाचा डोस दिल्यानंतर पुढील टप्प्यात संबंधितांना निरीक्षण कक्ष (ऑब्जरव्हेशन रूम) मध्ये काही काळ बसावे लागेल. यादरम्यान काही त्रास उद्भवल्यास उपचारासाठी प्रणाली उपलब्ध असेल.
लसीकरणासाठी को-विन अॅपवर करावी लागेल नोंदणी , राज्यस्तराच्या धर्तीवर जिल्हास्तरावर टास्क फोर्सचे असेल मोहिमेवर नियंत्रण, बूथवर कागदपत्रांच्या पडताळणीनंतर दिली जाईल लस,जिल्ह्यात शक्यतो एकाच कंपनीच्या लसीच्या वापरावर असेल ,लस प्राप्त झाल्यापासून बूथवर पोचेपर्यंत विशेष कोल्डचेनची निर्मिती, कंपनीनुसार ०.१ एमएल ते ०.५ एमएलचा असेल लसीचा डोस , ठराविक दिवसांच्या अंतराने एकूण दोन वेळा घ्यावी लागेल डोस लस, पहिली लस घेतल्यानंतर दुसऱ्यांदा लसीसाठी नोंदणीकृत मोबाईलवर मेसेज पाठविला जाईल. ऑटोडिस्पोझल सिरींजमुळे एका व्यक्तीस वापरानंतर सिरींज नष्ट, केली जाईल.लसीकरणासाठी डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ मनिष रेंघे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या