मुंबई
प्रज्ञा करूणा भिक्खू संघ, मुंबई (रजि.) आणि बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यामाने बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कान्हेरी बुद्ध लेणी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली (पूर्व), मुंबई येथे गुरुवार दि. ३१ डिसेंबर 2020 रोजी सकाळी. १0 ते सायं ५.00 वाजेपर्यंत ही धम्मपरिषद होणार आहे. यामध्ये भिक्खूसंघाची धम्मदेसना आणि मान्यवरांचे विचार ऐकायला मिळणार असून सर्व श्रद्धावान उपासक-उपासिकांनी या परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिषदेचे प्रमुख आयोजक भदन्न शांतिरत्न यांनी केले आहे.
धम्म परिवर्तन झाले परंतु विचार परिवर्तन झाले नाही, २०२१ च्या जनगणने मध्ये बौद्धांची भूमिका काय असणार? बौद्ध विरासतला शासक वर्गाकडून धोका आहे. अशा विविध विषयांवर धम्मपरिषदेमध्ये मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. सदर धम्मपरिषदेच्या अध्यक्षस्थानी धम्मपरिषदेचे प्रमुख मार्गदर्शक भदन्त विनयबोधी महाथेरो असणार आहेत तर डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो (विपश्यनाचार्य) धम्म परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी धम्मउपासक अविनाश जगताप (उद्योजक:पुणे), डॉ. जी.के. डोंगरगावकर - (संशोधक मार्गदर्शक, ज्येष्ठ विचारवंत, प्राचार्य - सत्याग्रह महाविद्यालय) प्रा. विलास खरात (राष्ट्रीय प्रभारी, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क, नवी दिल्ली) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून स्वागताध्यक्ष नाना भिसे, डॉ. संजय सोनावणे, दिलीप वाहुळे मुंबई अध्यक्ष:-बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क समाजसेवक आदी मान्यवरांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे. तसेच भदन्त शांतिरत्न, अध्यक्ष - भिक्खू संघ, मुंबई, भदन्त लामाजी, महासचिव - भिक्खू संघ, मुंबई, उपाध्यक्ष - भदन्त बोधीशील, भदन्त किर्तीप्रियो नागसेन, भदन्त प्रज्ञानन्द, सहसचिव - भदन्त शाक्य प्रज्ञानन्द, यांच्यासह भदन्त बोधानंद, भदन्त यशपाल, भदन्त आकाश बोधी, भदन्त संघरत्न आणि भिक्खूसंघ यावेळी उपस्थित राहणार आहे.
पाली आणि बुद्धिजम विभाग विद्यार्थी संघ, सत्याग्रह महाविद्यालय, खारघर, नवी मुंबई. यांचे या धम्मपरिषदेला विशेष सहकार्य राहणार आहे.कोरोनाच्या प्रभावामुळे महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सर्व नियमाचे पालन करुन ही परिषद होणार असून सर्व उपासक उपासिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन एस.वावळकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या