रविवारी ठाण्यात सावित्रीमाई फुले व्याख्यानमालिकेचे उद्घाटन
ठाणे,
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही समता विचार प्रसारक संस्था आयोजित करत असलेल्या सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेची सुरुवात येत्या रविवारी 3 जानेवारी या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी होत आहे. हे या व्याख्यानमालिकेचे 11 वे वर्ष आहे. गेल्या वर्षभरातील करोनाचे सावट कमी होत असताना आपण नव वर्षाचे स्वागत रविवारी सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेच्या उद्घाटन प्रसंगी प्रत्यक्ष भेटून करत आहोत. समता विचार प्रसारक संस्थेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील गाळा नं. ५६ या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन होत असून या वेळी `नवीन शिक्षण धोरण` या विषयावर खुला संवाद आयोजित केला आहे. समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ आणि संस्थेच्या कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर यात सहभागी होत असून अध्यक्षस्थानी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे असणार आहेत, असे संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी सांगितले.
व्याख्यान तुमच्या दारी, व्याख्याता तुमच्या घरी या संकल्पनेनुसार जानेवारी महिन्यात महिनाभर ठाण्यातील कोपरी, कळवा, माजिवडा, खारटण रोड, चिराग नगर, मनोरमा नगर, सावरकर नगर, गांधी नगर, वर्तक नगर, पंचगंगा राबोडी अशा विविध वस्तींमद्धे या व्याख्यानमालिकेचे आयोजन होणार आहे अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी यांनी दिली. या सर्व व्याख्यानांना विनामूल्य प्रवेश असून सर्व वस्तीतील लोकांनी या व्याख्यानांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या सह - सचिव अनुजा लोहार यांनी केले आहे. अधिक महिती साठी सुनील दिवेकर यांना ९९२०१८११०५ या नंबर वर संपर्क साधावा.
हे पण वाचा......
सडलेला मनुवाद गाडलेला बरा - मा.म.देशमुख
https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_273.html
0 टिप्पण्या