Top Post Ad

कृतघ्न महिला आणि नालायक पुरुष...

३ जाने.
आपल्या धडावर आपलेच डोके ठेवा....... म. फुले.
आहे का आमच्या धडावर आमचे डोके....... तर नाही.
आमच्या महिलांच्या आणि पुरुषांच्या डोक्यात बामणांचा भेजां आहे. महिलांच्या जास्तच.

आमचे लोक सर्व महिला पुरुष यांच्या डोक्यात बामणी भेजा घुसलेला आहे. शिक्षण मिळालं, पैसा आला समृध्दी आली. डॉक्टर, इंजिनीयर, अधिकारी, वकील, जज, उच्च शिक्षण झाले.. पण फायदा काय??? अशिक्षित बामणाच्या आम्ही पाया पडतो. एकबामण पुजारी गतिमंद आहे तरी शिक्षित लोक त्याच्या पायावर डोके ठेवतात. बुवा बाबा च्या पाया पडतो. देव देव करतो. सत्य नारायण करतो. जो देव चित्र विचित्र आहे. जो नाहीच त्याच्या वर विश्वास श्रद्धा ठेवतो. महिला यात जास्त आघाडीवर असतात. त्याच अंधश्रद्धा पोसतात.

अनेक महिला यांना माहिती नसेल की आज सावित्री बाई यांची जयंती आहे. बामण महिलासकट सर्व महिलांनी आज सकाळी नसलेल्या देवीची पूजा केली असेल. महिला शिकल्या नोकरी करतात पण डोक्यात भेजा नाही. कारण नालायक आई वडील यांनी फालतू संस्कार केले. सावित्री बाई फुले सांगितली नाही. हाच तर लोच्या आहे. सावित्रीबाई फुले यांच्या स्री शिक्षणाचा खरा फायदा बामण महिलांनी घेतला. ज्या महिलांना बामणी संस्कृतीने जिवंत जाळल्या. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. संपत्ती, जमिनी हक्का पासून वंचित ठेवले अशा बामनांची  पूजा महिला करतात. त्यांनी जन्माला घातलेले देव आणि त्यांनी लिहिलेले खोटे पोथ्या पुराणे, मनुस्मृती याचे वाचन पालन करतात. महिलांना सती जाण्या पासून वाचवण्या साठी इंग्रजांना यावे लागले. त्यांना शिक्षण मिळावे म्हणून सावित्री ज्योतिबा यांना जन्म घ्यावा लागला. त्यांना संपत्ती आणि सर्व हक्क मिळण्या साठी बाबासाहेब आंबेडकर यांना जन्माला यावे लागले. (हिंदु कोड बिल) सर्व बामणी देव पोथी पुराणे. सर्वच धर्माचे धर्म ग्रंथ हे पुरुष्यानी लिहिले म्हणून ते महिला विरोधी आहेत. महिलांना जात आणि धर्म नाही. तरीही भारतीय महिलांना याची जाणीव होत नाही. खरे तर या महिलांनी दिवस रात्र सावित्री बाई फुले यांची पुजा केली पाहिजे. पण भारतीय महिला कृतघ्न आहेत आणि पुरुष नालायक.

जय जिजाऊ.......जय सावित्री.
बाबा रामटेके - 80975 40506

-----------------------------------------

फोटो मधील मुलीचं नाव आहे लुजैन अल हाथलुल.. वय 31, सौदी अरेबियातील सामाजिक कार्यकर्ती आहे जी स्त्रियांच्या अधिकारांसाठी लढते पण आता लढू शकणार नाही, कारण तिला तब्बल 6 वर्षांची शिक्षा झाली आहे. भारतात एखादी चुकीची गोष्ट घडते तेव्हा आपण राज्यकर्त्यांना, नागरिकांना आणि शेवटी संविधानाला दोष देऊन मोकळे होतो, पण आपण स्वतः ती चुकीची गोष्ट दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतो का?? पुढाकार घेतो का?? तर नाही.

 लुजैन या मुलीचा गुन्हा इतकाच आहे ती पुरुषी पालकत्व नाकारते, म्हणजे एकटी स्त्री घराबाहेर पडू शकत नाही, ती बँकेत जाऊ शकत नाही, ती खरेदीला जाऊ शकत नाही, अगदी पासपोर्ट काढण्या पासून लग्न करण्यापासून ते घटस्फोट घेण्यापर्यंत सर्व अधिकार तिच्या घरातील पुरुषाला आहेत,त्यांनी परवानगी दिली तरच ह्या गोष्टी ती करू शकते. ह्याच 'पुरुषी पालकत्व कायद्याला' ती विरोध करत आहे ते पण आजच्या काळात.. भारतीय सनातनी संस्कृतीत स्त्रीला जसं बाप, भाऊ, पती, मुलगा याच्या वरदहस्ताखालीच राहावे लागायचे तसाच अगदी सेम हा 'पालकत्व कायदा' आहे बरं..

बरं तिने 2018 मध्ये दुसरा पण गुन्हा केलाय तो म्हणजे "स्त्री असून गाडी चालवण्याचा गुन्हा" म्हणजे तिकडे स्त्री गाडी सुदधा चालवू शकत नव्हती.. तिच्यावर राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा ठपका ठेऊन तिला तुरुंगात डांबलं गेलंय. भारतासारख्या देशात आता चूल आणि मूल दूर सारून चार भिंतीच्या बाहेर निघून स्त्रीचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं आहे. 26 जानेवारी 1950 ला भारतात संविधान लागू झालं आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. 1951 च्या पहिल्याच निवडणुकीला भारतीय स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला तो ही अगदी फुकट. त्यासाठी त्यांना कुठलेही आंदोलन, मोर्चा किंवा कठोर परिश्रम करावे लागले नाहीत. तोच मतदानाचा अधिकार सौदी अरेबियातील स्त्रियांना 2015 मध्ये मिळतो. म्हणजे आपल्या नंतर तब्बल 65 वर्षांनी..बघा विचार करा..

आजही भारतीय स्त्री उघडपणे संविधान काय आहे त्याने आपल्या आयुष्यात काय आमूलाग्र बदल घडवला आहे याबद्दल अनभिज्ञ आहेत, ते संविधान समजून घ्यायचा वाचून घ्यायचा प्रयत्न तर करत नाहीतच पण काही स्त्रिया संधी मिळेल तिथे त्याच संविधानाची अवहेलना करण्यात मात्र पुढे असतात..  केवळ स्त्रियांचे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता,लोकशाही, स्त्रियांचे मानवी हक्क मागितले म्हणून लुजैन नावाच्या ह्या तरुणीला तुरुंगात डांबले जात असेल तर संविधानामुळे सर्व स्वातंत्र्य फुकट उपभोगणाऱ्या भारतीय स्त्रियांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना म्हणता येईल.. बाकी उठता बसता  "थँक यु बाबासाहेब थँक यु बाबासाहेब" म्हंटल तरी ते कमीच आहे..इतके अनंत उपकार आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर आणि विशेषतः स्त्रियांवर..

-----किरण शिंदे       (डोंबिवली)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com