Top Post Ad

२६ जानेवारीला एक लाख ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांची सलामी- दिल्लीतील रस्ते जाम

प्रजासत्ताकदिनी प्रथमच दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड होईल. अखेर दिल्ली पोलिसांनी यासाठी परवानगी दिली. नव्या कृषी कायद्यांविरुद्ध परेडसाठी देशभरातून शेतकरी पोहोचत आहेत. ही परेड शांततेत काढली जाईल, असा संघटनांचा दावा आहे. राजकीय पक्षांनी यापासून दूर राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त दीपेंद्र पाठक म्हणाले, संयुक्त किसान मोर्चास सिंघू आणि टिकरीपासून सुमारे ६४ किमी आणि गाझीपूर बॉर्डरपासून ४६ किमी परेडची परवानगी देण्यात आली आहे. 

शेतकरी संघटना आणि दिल्ली पोलिसांमध्ये 26 जानेवारीची ट्रॅक्टर रॅलीवर सहमती झाल्यानंतर सिंघु आणि टीकरी बॉर्डवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. पंजाब आणि हरियाणावरुन ट्रॅक्टर येत आहेत. सूत्रांनुसार रविवारच्या रात्रीपर्यंत टीकरी, सिंघु आणि गाजीपूर बॉर्डरवर जवळपास 20 हजार ट्रॅक्टर पोहोचले आहेत. शेतकरी नेत्यांचा दावा आहे की, 26 जानेवारीच्या सकाळपर्यंत एक लाख ट्रॅक्टर येतील.

रविवारच्या संध्याकाळी रुटवर सहमती झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी टीकरी बॉर्डरपासून दिल्लीकडे येणाऱ्या रस्त्यावरील एका साडइने बॅरिकेडिंग हटवली आहे. आंदोलनाच्या स्थळावर जवळपास एक किलोमीटर पुढे सीमेंटचे बॅरिकेड्स आणि लोखंडाचे मोठे कंटेनर हटवून रस्ता रिकामा करण्यात आला आहे. यासोबतच ठरलेल्या रुटवर दिल्ली पोलिस आणि CRPF च्या जवानांनीही सुरक्षा व्यवस्था सांभाळली आहे. परेडमध्ये सर्वात जास्त ट्रॅक्टर टीकरी बॉर्डरवरुन दिल्लीत येतील. यामुळे येथे कडेकोट बंदोबस्त असणारर आहे. पोलिसांनी अट ठेवली आहे की, एका ट्रॅक्टरवर तीनपेक्षा जास्त लोकांनी बसू नये. दुसऱ्या गोष्टी ठरवण्यासाठी शेतकरी संघटना आणि पोलिस सोमवारीही बातचित करतील.

टीकरीवरुन दिल्लीच्या मार्गावर 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीदरम्यान सुरक्षादल आणि शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुणीही असणार नाही. एका पोलिस अधिकाऱ्यानुसार 25 जानेवारीच्या संध्याकाळी सर्व दुकाने बंद केल्या जाऊ शकतात. कारण, काही गडबड झाली तरीही वाहन आणि दुकानांना नुकसान पोहोचणार नाही. टीकरी बॉर्डरच्या जवळपास येथे शेतकरी जमा झाले आहेत, तो रहिवासी परिसर आहे. यामुळे येथे कडेकोट सुरक्षेचा बंदोबस्त केला जाईल. परेडच्या नियोजित मार्गाबरोबरच आजूबाजूच्या रस्त्यांवरही डायव्हर्शन योजना तयार करण्यात आल्या आहेत.

टीकरी बॉर्डरहून दिल्लीकडे येणार्‍या ट्रॅक्टर परेडसाठी फार्मर्स सोशल आर्मीचे एक हजार स्वयंसेवकही तैनात केले जातील. ही यादी पोलिसांनाही दिली जाईल. या स्वयंसेवकांचे नेतृत्व करणारे अजित सिंह म्हणाले, 'स्वयंसेवक ड्रेस कोडमध्ये असतील. त्यापैकी प्रथमोपचार, पाणी आणि चहा पुरवण्याशिवाय ट्रॅक्टर मेकॅनिक देखील असतील. यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षणही देत ​​आहोत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com