Top Post Ad

जाती आणि धर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात आहे

देशातील जातीयवाद अजून संपलेला नाही. तसेच धर्माची सर्कसही अजून संपलेली नाही, असे म्हणत आजही जाती आणि धर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात आहे. देशातील जनतेला एका संकुचित विचारसरणीत अडकवून ठेवण्याचे काम केले जात आहे. या विरोधात सर्वांना एकजुटीने लढा उभारावा लागेल. ही लढाई अस्तित्वाची आहे. आता आरएसएस विरुद्ध रेझिस्टन्स अशी ताकद उभी करावी लागेल, असे आवाहन प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर अरुंधती रॉय केले.  पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे आयोजित एल्गार परिषदेत त्या बोलत होत्या. परिषदेचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, निवृत्त पोलिस अधिकारी एस. एन. मुश्रीफ, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन आदी उपस्थित होते. या वेळी परिषदेचे आयोजक किशोर कांबळे यांना एल्गार पुरस्काराने गौरविण्यात आले.

 एल्गार परिषदेला  संबोधित करताना भारतीय जनता पक्ष आरएसएस आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष असून तो हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली देशावर मालकी गाजवू पाहत आहे. लपून वार करणे, तसेच दहशत निर्माण करण्याबरोबरच आणि हुकुमशाही लादण्याचे काम देशात सध्या सुरू आहे, अशा शब्दांत रॉय यांनी केंद्रातील मोदी सरकारवर नशाणा साधला आहे.  जात, धर्म आणि पुरुषत्व याबाबत सरकारच्या मनात खदखद आहे. त्यामुळे लव्ह जिहादविरोधी निर्णय घेतले जात आहेत. मुस्लिमांची कत्तल म्हणजे त्यांचाच गुन्हा असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे, असेही रॉय आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या. एल्गार परिषद ही भारतीय राज्यघटनेविरोधी काम करणारी परिषद नाही, असे सांगतानाच रॉय यांनी आरएसएसवर हल्लाबोल केला. शहरांमधील रस्त्यांवर दलितांवर खुलेआम अत्याचार करणारे तसेच लोकांमध्ये नकारात्मकता पसरवणारे आपण नाही आहोत. एकविसाव्या शतकात आरएसएस बामणवादाचे नेतृत्व करत आहे. संसद त्यांच्याच हातात आहे. त्यांचे आवडीचे औषध गोमुत्र हे आहे, असे रॉय पुढे म्हणाल्या.

कृषी कायदे सरकारने मागे घ्यावेत यासाठी मागील दोन महिन्यापासून दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. मात्र, हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दात अरुंधती रॉय यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर आरोप केला आहे. तसेच आपण या आंदोलनाच्या पाठीशी आहोत असेही त्यांनी जाहीर केले आहे. अरुंधती रॉय यांनी देशातील अनेक घडामोडींवर यावेळी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, आपल्या येथील पेशवाई गेली पण अद्यापही बामणवाद अस्तित्वात असून त्याचाच एक भाग म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बामण आणि वैश यांच्या मदतीने देशाचा कारभार चालवत आहेत. येणार्‍या काळात ही व्यवस्था आपल्याला मोडून काढायची आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. गेल्या काही काळापासून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या गोष्टीना आपण बळी पडू नये सर्वानी एकत्रित रहावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या, “आपल्या देशात ज्यावेळी करोना आजाराचे संकट आले. तेव्हा लाखो नागरिकांच्या नोकर्‍या गेल्या. मात्र, अंबानी, अदानी, मित्तल यांच्यासारख्या अनेक उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये कमालीची वाढ झाली. यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्योगपती, प्रसारमाध्यमं मोदी यांच्या आदेशानुसार काम करत आहेत. त्यामुळे मोदींच्या विरोधात कोणीही बोलण्यास तयार नाही. तर दुसरीकडे मागील सात वर्षात एकदाही मोदी मीडियाला सामोरे गेलेले नाही,  अमेरिकेच्या कॅपिटॉल हिलवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्ती आपल्या देशात सत्तेत आहेत. त्या संसद व लोकशाही संस्था नष्ट करत चालल्या असून, गोमूत्र हे त्यांचे आवडते औषध आहे, अशा शब्दांत रॉय यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. ब्राह्मण्यवाद, भांडवलशाही, पितृसत्ताक व्यवस्था आणि इस्लामप्रति असलेल्या द्वेषभावनेविरोधात एल्गार करण्याची गरज आहे. 

 पेशवाई गेली, तरी ब्राह्मण्यवाद संपलेला नाही. उलट त्याला कारखान्यात नेऊन आधुनिक मॅन्युअल व प्रोग्राम जोडला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या एकविसाव्या शतकातील ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात हे नेतृत्व सत्तेत बसले आहे, अशी खरमरीत टीका करुन रॉय यांनी वाढत्या आर्थिक विषमतेकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. कोरोनाच्या काळात पावणे दोन लाख जणांनी रोजगार गमावला असताना, अब्जाधीशांची संपत्ती मात्र ३५ टक्क्यांनी वाढली आहे. देशात काही कॉर्पोरेट कंपन्यांकडे सर्व साधन संपत्ती आहे. त्यावर मूठभर घराण्यांचा हक्क आहे. विरोधी पक्षांच्या घराणेशाहीवर हल्लाबोल करणारे पंतप्रधान मोदी या कॉर्पोरेट घराण्यांना मदत करतात, असा आरोप त्यांनी केला. नोटबंदी, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि आताचे कृषी कायदे हे मानवतेविरोधातील गुन्हे असून, आपण बेकायदा अध्यादेश काढणारे राष्ट्र झालो आहोत, अशी टीकाही त्यांनी केली.

लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा नरेंद्र मोदी यांचाच माणूस होता, पठाणकोटमध्ये मुंगी देखील जाऊ शकत नसताना दहशतवादी पोहोचलेच कसे? मोदी यांनी देशासाठी खूप काही केल्याचे चित्र उभे केले जाते मात्र प्रत्यक्षात काहीचे केलेले नाही. “मनुवादी आणि मनीवादी (भांडवलदार) एकत्र येऊन जात, पंथ, धर्माच्या नावाने आपले शोषण करत आहेत. मात्र असे अनेक मोदी येतील आणि जातील पण अखेरच्या श्वासापर्यंत मनुवादाविरोधात आमची लढाई सुरू राहील, असे कोळसे पाटील म्हणाले. दिल्लीतील शेतकरी आंदोलन हिंसक होण्यामागे भाजप,आरएसएस यांचा हात आहे. आंदाेलन बदनाम करून ते माेडून काढण्याचा माेदी सरकारचा डाव हाेता. परंतु हे आंदाेलन माेदींच्या गळ्याभाेवती आवळत चालले असून अंबानी-अदानींना पाठीशी घालण्याचे काम माेदी करत आहेत, असा आरोपही. कोळसे पाटील यांनी केला. ‘मनुवादी आणि मनीवादी एकत्र येऊन जात, पंथ, धर्माच्या नावाने आपले शोषण करत आहेत. त्यांचा सामना करत नवी व्यवस्था आणण्याचा संदेश देण्यासाठी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कितीतरी मोदी येतील आणि जातील, पण शेवटच्या श्वासापर्यंत मनुवाद आणि मनीवादाविरोधातील लढाई सुरू राहील,’ असे कोळसे पाटील म्हणाले.

-------------


On Saturday morning, people entering Pune’s Ganesh Kala Krida auditorium were greeted by dozens of police officials at every gate, multiple security checkpoints with metal detectors, repeated bag-checks and body pat-downs, and police sniffer dogs roaming around the compound.

The intense police scrutiny was on account of the event held at the auditorium: Elgar Parishad 2021, the defiant second edition of an event that became controversial after the Maharashtra police accused its organisers – a coalition of 250 anti-caste and human organisations – of instigating caste-based violence in Pune’s Bhima Koregaon area on January 1, 2018.The first Elgar Parishad was held in Pune’s Shaniwar Wada on December 31, 2017, a day before lakhs of Dalits from across India gathered at the village of Koregaon Bhima to commemorate the 200th anniversary of a battle in which a Dalit contingent of the British army defeated the region’s Peshwa Brahmins. To mark the occasion, speakers at the Elgar event highlighted the rise of “new Peshwas” in the form of right-wing Hindutva forces across the country.

Since June 2018, 16 activists and intellectuals have been arrested and denied bail for allegedly provoking the Bhima Koregaon violence, operating as “urban Naxals” with Maoist connections and carrying out “anti-national” activities. They include educators Anand Teltumbde, Shoma Sen and Hany Babu, Adivasi rights activist Stan Swamy, poets Sudhir Dhawale and Varavara Rao, lawyer Sudha Bharadwaj and activists Gautam Navlakha, Arun Ferreira and Vernon Gonsalves.

The authorities claim they were associated with organising the first Elgar Parishad, though most of them have denied this.

Meanwhile, Hindutva leaders Sambhaji Bhagat and Milind Ekbote – also accused of instigating the 2018 violence – have not been arrested.

The second Elgar Parishad on Saturday was organised as a tribute to the 16 arrested activists as well as a reiteration of their anti-caste, anti-Hindutva ideologies. The date of the event marked the death anniversary of Gandhi and the birthday of Rohith Vemula, a Dalit student of Hyderabad Central University whose suicide in 2016 triggered a national students movement against casteism in educational institutes.

“The institutional murder of Rohith Vemula and the enforced disappearance of [JNU student] Najib Ahmed show that there are histories of casteism and fascism deeply entrenched within universities,” said Ayesha Renna, one of the speakers at the event and one of the students of Delhi’s Jamia Milia Islamia who stopped police officials from beating up a fellow student during the 2019 protests against the Citizenship Amendment Act.

Other speakers at the Elgar event included author Arundhati Roy, former bureaucrat Kannan Gopinathan, Justice BG Kolse-Patil, student leaders Sharjeel Usmani and Ayesha Renna, and journalist Prashant Kanojia.

‘Laws implemented selectively’- Arundhati Roy, the keynote speaker, spoke at length about the many different laws and methods the current government is using to clamp down on minorities of various kinds. “In our country laws are selectively applied depending on your class, caste, ethnicity, religion, gender and political beliefs,” she said. “So, while poets and priests, students, activists, teachers and lawyers are in prison, mass murderers, serial killers, daylight lynch mobs, disreputable judges and venomous TV anchors are handsomely rewarded and can aspire for high office. The highest, even.”

Focussing on the “Bhima Koregaon-16” – the arrested activists – she said, “Nobody, not even their captors probably believe that they have committed the hackneyed crimes they are being accused of – planning the assassination of the prime minister, or plotting murder. Everybody knows they are in jail for their intellectual clarity and moral courage – both of which are viewed by this regime as a significant threat.” Read her full speech here.

The Elgar event was attended by 200-300 people, a lower turnout than the organisers expected. “I think this time the response is smaller because of Covid-19 and because some people are afraid after the police response to the previous Elgar Parishad,” said Sushant Kshirsagar, an event volunteer who was manning one of the many stalls selling books about casteism and politics at the venue. “But it is important to attend such events because people need to be made aware of the ways in which social activists are being targeted and arrested in the past few years.”

‘Elgar should happen every year’

Several other attendees expressed similar views about the need for political events like Elgar Parishad. “We may have got Independence but the system of Brahmanism has not yet ended,” said Aditya Santosh, a Masters of Arts student from Pune who attended Elgar along with two other members of his experimental theatre group.

Santosh said that his under-graduate college in Pune was heavily influenced by Hindutva ideology. “I have experienced their censorship on students – they did not allow us to perform a play on Safdar Hashmi. So I feel it is my duty to stand with marginalised voices.”

While Santosh was not in Pune during the first Elgar Parishad in 2017, construction supervisor Hanumant Shiv remembers not just the Elgar event but also the violence of Bhima Koregaon in 2018. “I was there during the riots and I saw who instigated the violence. But they are not the ones facing action – instead, our people are the ones being targeted and denied justice,” said Shiv, who describes himself as a caste-less Ambedkarite. “I think Elgar should happen every year in order to take this movement against casteism and communalism forward.”



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com