मनसेने केला उपस्थित केला सवाल, उत्तर न मिळाल्यास रस्त्यावर उतरुन केले जाईल आंदोलन
ठाणे :
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन टिडीआरच्या बदल्यात ढोकाळी येथील २० एकरचा भुंखडा कल्पतरु या विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात आला होता. २०१७ मध्ये येथे सेंट्रल पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भुमीपुजनही करण्यात आले होते. परंतु आज तीन वर्षे उलटूनही हे सेंट्रल पार्क ठाणेकरांना उपलब्ध का झाले नाही. असा सवाल मनसेचे शहर उपाध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी उपस्थित केला आहे. ते ठाणेकरांना मिळणार आहे का? की विकासच्या घशात घातले जाणार आहे, याबाबत आता शंका निर्माण झाल्याचेही त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या या पार्कची स्थिती काय आहे, ठाणेकरांच्या सेवेत ते दाखल होणार की नाही, याची उत्तरे मिळावीत अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. परंतु या बाबत अपेक्षित उत्तरे न मिळाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या