शनिवारी नाना पटोले यांनी म्हटले, 'आम्ही मागे हटलेलो नाही. जेव्हा त्यांचे चित्रपट रिलीज होतील किंवा आम्हाला ते दिसतील तेव्हा आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू. आम्ही लोकशाहीच्या नियमांचे पालन करु. आम्ही 'गोडसेवाले' नाही तर 'गांधीवाले' आहोत.' नाना पटोले हे देखील म्हणाले, 'मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात नाही तर त्यांच्या कामाविरोधात बोलायचो. ते असली हिरो नाहीत. जर ते हिरो असते तर, लोकांच्या कष्टादरम्यान त्यांच्या जवळ उभे राहिले असते. मात्र, त्यांना फक्त 'कागदी वाघ' बनून रहायचे असेल तर माझी हरकत नाही'
शेतकरी आंदोलनाविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान या अभिनेत्यांवर शेतकऱ्यांच्या मुद्द्याचे समर्थन न करण्याचा आरोप लावला होता. त्यांनी म्हटले होते की, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बिग बी आणि अक्षय कुमार गप्प का आहेत, येणाऱ्या काळात महाराष्ट्रात या अभिनेत्यांच्या चित्रपटांची शूटिंग होऊ दिली जाणार नाही आणि त्यांचे चित्रपटही रिलीज होऊ दिले जाणार नाही.
दरम्यान पेट्रोल आणि डीझेलच्या भावांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सलग 12 व्या दिवशी ही वाढ झाली आहे. नवीन दरांप्रमाणे आता मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचे भाव चक्क 97 रुपयांवर पोहोचले. तर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 90.58 रुपयांनी विकले जात आहे. दिल्लीत आज डीझेलच्या किमती 37 तर पेट्रोलच्या किमती लिटरप्रमाणे 39 पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत. राजस्थानच्या गंगानगरमध्ये पेट्रोलचे भाव तब्बल 101.22 आणि मध्य प्रदेशातील अनूपनगर येथे 101 रुपये प्रति लिटर भाव झाले आहेत. 4 फेब्रुवारीपासून आतापर्यंत रोज पेट्रोल आणि डीझेलच्या भावात वाढ होत आहे. अर्थात या महिन्यात इंधनाच्या दरांमध्ये 14 व्या वेळी वाढ करण्यात आली आहे.
फेब्रुवारीत इंधनाचे दर 14 वेळेस वाढवण्यात आले. या 14 दिवसांत दिल्लीत पेट्रोल 4.03 रुपयांनी तर डीझेल 4.24 रुपयांनी महागले आहे. तत्पूर्वी जानेवारी महिन्यात 10 वेळा इंधन महाग झाले होते. गेल्या महिन्यात दिल्लीत पेट्रोलच्या किमती प्रति लिटर 2.59 रुपयांनी तर डीझेलच्या किमती 2.61 रुपयांनी वाढवण्यात आल्या. अर्थातच या वर्षाच्या सुरुवातीला 2 महिने सुद्धा पूर्ण झाले नाहीत आणि पेट्रोल 6.77 रुपये प्रति लिटर आणि डीझेल 7.10 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे. केंद्र सरकार पेट्रोल-डीझेलवर अबकारी कर कमी करण्यास तयार नाही. एकट्या दिल्लीचा विचार केल्यास दिल्लीत एका लिटर पेट्रोलच्या मागे केंद्राकडून 32.90 रुपये आणि डीझेलवर 31.80 रुपये एवढा अबकारी कर लादला जातो. राज्य सरकार त्यात वेगळा व्हॅट लावतात. दिल्ली राज्य सरकारकडून एका लिटर पेट्रोलवर 20.61 रुपये व्हॅट म्हणून आकारले जातात.
0 टिप्पण्या