ठाणे :
को-रो-ना चा होणारा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगर पालिकेनेही कठोर पावले उचलली आहेत. पालिकेचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी आता अभ्यंगतांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. महापालिका मुख्यालयासह प्रभाग समिती कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अत्यावश्यक काम असेल तर परवानगी घेऊनच पालिकेत प्रवेश दिला जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी 50 टक्के उपस्थितीची काळजी घ्यावी यातून अग्निशमन, सार्वजनिक आरोग्य विभाग, जन्म-मृत्यू, उद्यान, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन, विद्युत, पाणी पुरवठा, मलनिसारण, सुरक्षा विभाग, कार्यशाळा या विभागांना यातून वगळण्यात आले आहे.
तसेच महापालिकेच्या सेवेत असलेल्या 55 वर्षावरील व्यक्तींना आळीपाळीने बोलावले जाणार आहे. मुख्यालय तसेच प्रभाग समितींच्या कार्यालयात नागरीकांची गर्दी टाळण्यासाठी केवळ अत्यावश्यक कामांसाठीच नागरीकांना प्रवेश दिला जाणार आहे. अत्यावश्यक काम असल्यासच नागरिकांना खातरजमा करुन महापालिकेत सोडण्यात येणार आहे. नागरीकांनी पालिकेच्या वेबसाईटच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. याशिवाय टपाल आले असल्यास ते प्रवेशद्वाराच स्विकारले जाणार आहे. तसेच लोकशाही दिन, मुख्यालय दिनही रद्द करण्यात येत आले असून नागरीकांनी आपली काही देयके असतील ती ऑनलाईनच्या माध्यमातून भरावीत असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. अधिका-यांना बैठका घ्यायची असतील तर गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी किंवा अधिकाऱ्यांनी खाजगी व्यक्तींसमवेत बाहेर बैठका घ्याव्यात असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या