:

या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस, ठामपा अधिकारी आणि डॉक्टर यांची चौकशी समिती नेमण्यात येणार असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींच्या नातेवाईकांना एक लाखांचे अर्थसाह्य करण्यात येणार आहे, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अवघ्या 10 मिनिटातच गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील मृतांच्या कुटुंबियांना भेटून त्यांनी त्यांचे सांत्वन केले. प्रचंड अंधार दाटलेला असतानाही डॉ. आव्हाड यांनी जळीत रुग्णालयात प्रवेश करुन मदतीचे कार्य स्वत: हाती घेतले.
या संदर्भात त्यांनी सांगितले की, पहाटेच्या सुमारास कौसा येथील प्राईम रुग्णालयाला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. एकंदर 20 रुग्ण होते. त्यातील 4 जण मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कशामुळे आग लागली, याची चौकशी केली जाईल. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जखमींनाही एक लाख रुपये दिले जातील. प्रामुख्याने ही घटना का घडली, कशी घडली? याची चौकशी ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि डॉक्टर यांच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करुन अभिप्राय देतील.
0 टिप्पण्या