मात्र त्यानंतर काही वेळातच तिथं मुंबई नाका पोलिस दाखल झाले आणि त्यांनी भावे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तब्बल सहा तासाच्या चौकशीनंतर भावे यांना सोडण्यात आले. यात त्यांच्यावर विनापरवना आंदोलन करणे. तसेच असभ्य वर्तन करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या दरम्यान जितेंद्र भावे यांच्या समर्थनार्थ आलेल्या २५ जणांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन, बेकायदेशीर जमाव गोळा करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र भावे महाराष्ट्रातील आम आदमी पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आहेत. सोबतच नाशिक आणि इतर जिल्ह्यांमध्ये ते दिल्लीच्या धर्तीवर 'मिशन हॉस्पिटल' नावाची एक चळवळ चालवतात. यातून ते रुग्णांना ऑक्सिजन, रेमडिसीव्हिर, अशा गोष्टी मिळवून देण्यासाठी प्रयतन करतात. सोबतच ते रुग्णांचं हॉस्पिटलमधील बिलं कमी व्हावं म्हणून देखील प्रयत्न करतात. आपल्या या सामाजिक कार्यातून आजपर्यंत त्यांनी अनेक रुग्णांना मदत केली आहे तसेच आतापर्यंत रुग्णांचे पाच कोटीहून अधिक रुपये वाचवले असल्याची चर्चा आहे.
जितेंद्र भावे यांच्या या अर्धनग्न होऊन गांधीगिरी करत केलेल्या आंदोलनाच्या फेसबुक लाईव्हचा एक व्हिडीओ राज्यात प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला १९ कोटी पेक्षा जास्त रिच आहे. त्यातील व्हिळ्ज आहेत तब्बल २२ लाख, तर शेअर्स आहेत जवळपास ३४ हजारांच्या जवळपास. लाईक्स सांगायचे झाले तर ते आहेत साधारण ९ लाख २५ हजारच्या घरात..
0 टिप्पण्या