मुंबई
बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी तसेच संघाच्या संस्कार समितीच्या संयुक्त विद्यमाने बुद्धपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात ऑनलाइन पद्धतीने मुंबई येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाची सुरुवात संघाचे सरचिटणीस संजय तांबे यांनी पुष्प, गंध अर्पण करून व दीप प्रज्वलन करून केला कोरोना महामारीत दिवंगत झालेल्या जगातील सर्वच व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली, संघाचे कार्याध्यक्ष दिपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे मनोज पवार यांनी केले असून धार्मिक विधी ही त्यांनीच पठण केला.
संस्कार समितीचे संदीप गमरे यांनी गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण यावर उत्कृष्ट असे माहितीपर मार्गदर्शन केले, तसेच अमित पवार यांनी आपल्या सुमधुर आवाजात बुद्ध गीतगायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संघाचे प्रमुख विश्वस्त संजय पवार, विश्वस्त राजाभाऊ गमरे त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष दिपक मोहिते, सरचिटणीस संजय तांबे, कोषाध्यक्ष संदीप पवार तसेच विभाग क्र. ३ चे संदेश जाधव, विभाग क्र. ४ चे विभाग अधिकारी अजय जाधव, विभाग क्र. २चे संजय पवार, संतोष जाधव त्याचप्रमाणे मनोज पवार, अमित पवार आदींनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास संघाची मध्यवर्ती कमिटी, विश्वस्त मंडळ त्याचबरोबर विभाग अधिकारी व सर्व शाखा त्यांचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कोरोना वायरस कोव्हिड १९ चे गांभीर्य लक्षात घेता सदर कार्यक्रम ऑनलाइन व्हीडिओ कॉन्फरन्स पद्धतीने घेण्यात आला, सर्वांचे आभार व्यक्त करून सरचिटणीस संजय तांबे यांनी आभारप्रदर्शन व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
0 टिप्पण्या