Top Post Ad

ठाण्यातील घोडबंदर येथील लसीकरण केंद्रावर गैरकारभार... लसी गायब

 


ठाणे : प्रसारमाध्यमांमधून कोरोनाची आकडेवारी फुगतच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले असतानाच लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. मात्र ठाणे महानगर पालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसींची पळवा-पळवी होत असल्याची संतापजनक बाब स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा सर्व प्रकार शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांनी उघडकीस आणला. त्यांच्यासमोरच प्रत्यक्षात लसीकरण केंद्रावर हा प्रकार झाला. 

लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रांवर लांबच-लांब रांगा लागत आहेत. काही वेळा लस उपलब्ध न झाल्यास ते केंद्रच बंद ठेवण्यात येत असून यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शहरात एवढी गंभीर परिस्थिती असताना नगरसेवक नरेश मणेरा यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या महत्वाच्या प्रश्नाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. घोडबंदर येथील लसीकरण केंद्रावर हा गैरकारभार सुरू असल्याची माहिती त्यांनी स्थायी समितीला दिली आहे. या लसीकरण केंद्रावर २०० लस उपलब्ध होत्या. मात्र, या ठिकाणी काम करत असलेल्या डॉक्टरांनी केवळ १०० टोकन देऊन या १०० लोकांनाच लस दिली. उर्वरित १०० लसींबाबत स्वतः मणेरा यांनी विचारणा केली असताना दोन नगरसेवकांकडे या लस उपलब्ध असल्याचे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले, 

मात्र प्रत्यक्ष नगरसेवकांना देखील विचारणा करण्यात आल्यानंतर असा काही प्रकार झालाच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर १५० लोकांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे उत्तर देऊन या डॉक्टरांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या दोन ते तीन दिवसात १०० लसीचा साठा गायब असल्याचा आरोप नरेश मणेरा यांनी केला असून या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आता लसीचा काळाबाजार होत नाही ना? अशी शंका आता स्थायी समिती सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com