
शहापूर तालुक्यातील तानसा तलाव परिसरात २९ वर्षां पूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर २४ जून हा विजय दिन म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या गावात सभा घेऊन साजरा केला जातो. त्यानुसार वार गुरुवार शिसवली या गावी सकाळी ठीक ११:०० वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रभावी विजय दिन साजरा करण्यात आला. २९ वर्षांपूर्वी २४ जून १९९२ साली वन विभागाचे अधिकारी आणि पोलीसांनी येथील जमिनी कासणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांवर दहशत बसवून त्यांना हाकलून देण्यासाठी अमानुष गोळीबार केला होता.त्यात कॉ.रघुनाथ भुरभुरा यांच्या छातीतून गोळी आरपार निघून गेली, त्यांना लगेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उचलून मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले व त्याचा प्राण वाचवले. इतरही अनेक जण या गोळीबारात जखमी झाले.पण तरीही शेतकरी आदिवासींनी मागे न हटता जोरदार प्रतिकार केला आणि जुलमी पोलीस व फॉरेस्ट च्या अधिकाऱ्यांना पळवून लावले.

0 टिप्पण्या