

आपल्या भाषणात पाटीलखेडे पुढे म्हणाले, दि.बा.पाटील यांच्या नावाबाबत आम्हाला वाद नाही. मात्र काही लोकांच्या दृष्टीने एवढ्या मोठ्या अंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक नेत्यांचे नाव कशाला अशा कुत्सित मानसिकतेने ते ग्रासले आहे. दि.बा पाटील यांचे नाव या विमानतळाला मिळालेच पाहिजे. मात्र इथल्या व्यवस्थेने या मागणीला कलाटणी देण्यासाठी आता विविध मागण्यांचा रेटा पुढे लावला आहे. त्यातून छत्रपती शिवरायांचे नाव देखील देण्यात यावे अशी मागणी होत आहे. मात्र मुंबईसारख्या प्रमुख विमानतळाला शिवरायांचे नाव असताना त्याच नावाचा पुन्हा आग्रह कशाला तर यामागे केवळ राजकारण आणि लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा डाव आहे. तेव्हा आम्ही देखील या द्वारे आता मागणी करीत आहोत की, राजर्षि शाहू महाराजांचे नाव या विमानतळाला देऊन राजर्षिचा गौरव व्हावा. अशी मागणी पाटीलखेडे यांनी केली.
राजर्षि शाहू महाराजांचा गौरवाची महती सांगणारी कविता वाचून प्रमोद इंगळे यांनी राजर्षिंना अभिवादन केले, तर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाकरिता विलास शंभरकर आणि रमेश तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या