महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक ३० जुलै रोजी टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, सेवादल महाराष्ट्रचे प्रभारी लालजी मिश्रा, अखिल भारतीय सेवादल समन्वयक व मध्य प्रदेशचे प्रभारी कृष्णकांत पांडे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात नाना पटोले पुढे म्हणाले, देशाची सेवा करण्याचे व्रत घेऊन नारायण हर्डीकर यांनी नागपुरात सेवादलाची स्थापना केली. काँग्रेसचा विचार हा देशहिताचा विचार असून तो शेवटच्या माणसापर्यंत पोहवण्याचे काम सेवादलाने केले आहे. सेवादलाने देश जोडण्याचे काम केले आहे. इंग्रजांच्या विरोधात सेवादलाने संघर्ष केला. आता देशातील सत्तेविरोधातच संघर्ष करण्याची वेळ आली आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंनी या देशाच्या विकासाची पायाभरणी केली. मोठ-मोठे प्रकल्प उभे केले, संस्था निर्माण केल्या. नेहरुंनी उभे केलेले सर्व वैभव एक एक करुन विकण्याचे काम सध्या केले जात आहे. इतिहास पुसण्याचे कामही केले जात आहे. या शक्तींना थोपवण्यासाठी सेवादलाने नव्या ताकदीने काम केले पाहिजे. महाराष्ट्रात सेवादलाचे काम अशा पद्धतीने करा की त्याची दखल देशपातळीवर घेतली पाहिजे.
0 टिप्पण्या