
दिवा समिती अंतर्गत वक्रतुंड नगर येथील वैभव मोहिते यांचे व साईनाथ नगर येथील राकेश शिंदे यांचे अनधिकृत आरसीसी बांधकाम व कॉलम गॅस कटरच्या साहाय्याने तोडण्यात आले.सदर अनधिकृत बांधकामे निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे आणि दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली. दरम्यान दिवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३९७ (क) (१) ख, अन्वये राकेश राजाराम शिंदे आणि रवी गोविंद राडे यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
0 टिप्पण्या