Top Post Ad

सलून कारागिरांनी संघटीत होणे काळाची गरज - सागर तायडे

मुंबई - इतर कामगारांप्रमाने सलून कामगाराला ही सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व सलून व्यवसायिक आणि कुशल कारागीर युनियनच्या माध्यमातून एका छताखाली संघटीत होणे अत्यंत गरजेचे आहे, असे परखड विचार   स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सागर तायडे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष  महाविर गाडेकर  यांच्या आदेशानुसार सलून व्यवसायिक आणि कुशल कारागीर यांच्या मूलभूत समस्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय जनसेवा पक्षाद्वारे आज चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी तायडे बोलत होते. 

राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष संजय पंडित, ज्येष्ठ सल्लागार शेखरकाका भोर आणि ठाणे जिल्हा कार्यकारीणीतील ज्येष्ठ सल्लागार तुकाराम सोनवणे  तसेच समाजसेवक जालिंदर यादव या चर्चासत्रात सहभागी झाले होते. यावेळी सलून करागीरांना भेडसावणारे विविध प्रश्नांवर साविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी तायडे पुढे म्हणाले,  सर्व असंघटित सलून कारागीर आणि सलून व्यवसायिकांनी युनियन च्या माध्यमातून संघटीत होऊन मा.कामगार आयुक्तालयाच्या योजने नुसार सर्व सुविधा,कामगार हक्क,व अधिकार मिळविण्यासाठी संघटित होऊन सनदशीर मार्गाने संघर्ष करावा लागेल तसेच  सलून क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

     राज्यातील इमारत बांधकाम कामगार, फेरीवाले यांच्यासारख्या असंघटित कामगारांप्रमाणे सलून कारागिरांनाही मूलभूत हक्क आणि शासकीय सुविधा मिळवून देण्यासाठी सर्व सलून करागीरांना लवकरच समाजातील विविध मान्यवर बांधवांच्या सहकार्याने युनियनच्या माध्यमातून एकाच छताखाली संघटीत करून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येतील असे मत राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष संजय पंडित यांनी  व्यक्त केले. इतर कामगारांप्रमाने आणि असंघटीत कामगार कायद्याच्या तरतुदी नुसार सलून कारागिराला सुध्दा सामाजिक कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत पेन्शन योजना, वैद्यकीय सुविधा आणि इतर शासकीय सुविधा मिळणे गरजेचे आहे,त्यासाठी युनियन सारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही असेही पंडित यांनी सांगितले,

नाभिक समाजाचा पारंपरिक सलून व्यवसाय टिकविण्यासाठी आणि व्यवसायात विविध कारणांनी आलेल्या अडचणी दूर करून आधुनिकता आणण्यासाठी व्यवसायिक आणि कारागीर एकच छताखाली येणे खुप गरजेचे आहे असे मार्मिक विचार   भोरकाका यांनी मांडले. आज नाभिक समाजात आणि सलून व्यवसायात विविध संघटना आणि असोसिएशन कार्यरत आहेत, परंतु एकात्मते अभावी सलून व्यवसाय सध्याच्या स्पर्धेच्या युगात मागे पडताना दिसत आहे, याची खंत ठाणे जिल्हा सल्लागार सोनवणे यांनी व्यक्त केली. 

पारंपरिक सलून व्यवसाय आणि कारागीर टिकविणे हे सर्वात मोठे आव्हान आज नाभिक समाजापुढे आहे, वर्षानुवर्षे सलून काम करणाऱ्या असंघटित कुशल कारागीरांच्या मूलभूत प्रश्नांकडे आजवर कुणीही फारसे लक्ष दिलेले नाही, इतर क्षेत्रातील असंघटित कामगार युनियन च्या माध्यमातून संघटित होत असल्यामुळे त्यांची सनदशीर मार्गाने नांव नोंदणी होऊन त्यांना राज्य व केंद्र सरकारच्या सामाजिक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत आहे.  सलून कामगार कुशल कारागीर असूनही त्यांना बारा बारा तास काम करूनही कुशल सलून करागीर म्हणून आजही त्याचा योग्य पुरेसा मोबदला मिळत नाही, शासनाकडून देखील कसलेही प्रोत्साहन आणि सुविधा मिळत नसल्याने सलून कारागीर अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत, यावर सर्वांचे एकमत झाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com