कोणतीही आपत्ती आली की, शिवसेना ही आपदग्रस्तांसाठी मदतीसाठी नेहमीच तत्पर असते. यावेळी सुध्दा कोकणातील ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक महापौर नरेश म्हस्के यांच्या वतीने मंगळवारी (27 जुलै) पाठविण्यात येणार आहे. ठाण्यातील ज्या दानशूर नागरिकांना व संस्थांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करावयाची आहे, त्यांची मदत ही निश्चितच पूरग्रस्तांपर्यतच पोहचवण्याची जबाबदारी आम्ही घेवू असे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले आहे. महाड आणि परिसरातील गावांना पूराचा प्रचंड फटका बसला असून संपूर्ण संसार उध्वस्त झाले आहेत. अशा पूरग्रस्तांना तातडीच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत शिवसेनेच्यावतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर नरेश म्हस्के यांच्यावतीने पाठविण्यात येत आहे. या मदतकार्यात इच्छुक ठाणेकरांनी सढळ हस्ते आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे
महाडमधील तळीये या गावी दरड कोसळून संपूर्ण गाव उध्वस्त झाल्याची बातमी कळताच पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के हे ठाणे आपत्ती प्रतिसाद दलासह घटनास्थळी दाखल झाले. तर दुसरीकडे या पूरग्रस्तांना तात्काळ जास्तीत जास्त मदत पोहचवा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते, त्यानुसार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंची मदत ठाण्याहून पहिल्या टप्प्यात पोहचवली सुद्धा. मात्र या पूरग्रस्तांना आणखी मदत पोहचावी यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे ट्रक येत्या दोन दिवसात पाठविले जाणार आहेत. या साहित्याचे पॅकींग सध्या ठाण्यातील हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे सुरू असून त्याचा आढावाही पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी आज घेतला.
मदतकार्यात इच्छुक ठाणेकरांनी महापौर नरेश म्हस्के ९८१९३८९०८० तसेच ९८७०५०४८१८ महापौर कार्यालय क्रमांकावर संपर्क साधावा.
0 टिप्पण्या