केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणामुळेच आज सर्व सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले असून देशातील काळे धन येणार म्हणून केलेली नोटबंदी,प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार म्हणुन निवडकीत दिलेले आश्वासन,2 कोटी बेरोजगार युवकांना नोकरी या सर्वच विषयावर केंद्रातील भा.ज.पा.सरकार फोल ठरली असून भारतीय जनता पार्टीचे पापाचा घडा भरत चालला लवकरच हे चित्र स्पष्ट होईल, जनताच त्यांना आता चोख उत्तर देईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी ठाण्यात व्यक्त केला.
ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ, असे थेट आव्हानच यावेळी पटोले यांनी भाजपला दिले आहे. या कार्यक्रमात त्यांनी मोदी सरकारवरही तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. या नोटबंदीमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. मोदींनी काळा पैसा देशात आणणार होते, याबरोबरच ते १५ लाख रुपये देखील तुमच्या खात्यात टाकणार होते. मात्र, यांपैकी त्यांनी काहीही केलेले नाही. नोटाबंदीनंतर तर लोक रांगेतच मरण पावले. अजूनही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये आले नाहीत, असे सांगतानाच भाजप सरकार जनतेचे खिसे कापण्याचे काम करत आहे, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले आहे. जीएसटी आल्यानंतर हे सगळे पैसे कुणाच्या घरी गेले हे सर्वांना माहीत आहे, असे सांगत पटोले यांनी मोदींवर उद्योजक आणि व्यावसायिकांचे खिसे भरल्याचा थेट आरोप केला. सामान्य माणसाला मात्र जीएसटीचा काहीच फायदा झाला नसल्याचे ते म्हणाले. देशात लशीचा तुटवडा आहे. शिवाय पूर्वी मोफत मिळत असलेले ऑक्सिजन आता केंद्र सरकारमुळे विकत घेण्याची वेळ आली आहे आणि ही वेळ आणण्याचे पाप मोदी सरकारने केले, असेही पटोले पुढे म्हणाले. केंद्रातील सरकारच्या निर्देशानुसारच अनेक चुकीच्या प्रकारच्या चौकश्या केला जात असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
0 टिप्पण्या