कळवा प्रभाग समितीमधील खारेगांव परिसरातील तीन वेगवेगळ्या अनधिकृत इमारतीतील ३२ खोल्यांचे बेकायदेशीर बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. तसेच तळ अधिक 7 मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम जेसीबी तसेच मजुरांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्याचे काम चालू आहे. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अतिक्रमण निष्कासन . फारुख शेख, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.
0 टिप्पण्या