Top Post Ad

अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या विचारसरणीला मातीत गाडण्याची गरज

 

   आपण सर्व भारतीय विज्ञानयुगाकडे वाटचाल करीत आहोत. अशा परीस्थीतीतही अंधश्रद्धेची कीड समाजाला चिकटून बसलेली आहे. तथाकथित देवी-देवतांच्या नावावर भोळ्या-भाबडया जनतेला वेठीस धरण्यात येत आहे. विशेषतः महीलावर्ग या देवी-देवतांच्या नादी लागलेला दिसून येत आहे. अनेक संत,बापू व बुवा लोक सामान्यजनांच्या भावनांशी खेळत असतात. ग्रामीण भागात अजूनही पाहीजे त्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्यात आलेली नाही. एखाद्या माणसाचे जीवन जर अस्थिर दिसले व वैदयकीय उपचार करूनही तो ठीक होत नसेल तर त्याला एखाद्या मांत्रीकाकडे नेले जाते. तो भोंदु बाबा त्यांना निंबु-ताईत देवून उपाय करायला सांगतो तसेच अमुक तुझ्या शत्रूने तुझ्यावर भानामती केली आहे. असे सांगतो मग पिडीत व्यक्ती संशयातील व्यक्तीला मारझोड करतो प्रसंगी हत्यासुद्धा घडवून आणतो. असे प्रसंग समाजात अनेक ठिकाणी घडताना दिसून येतात.

अलीकडेच चंद्रपूर जिल्ह्यातील वणीखुर्द येथे घडलेले प्रकरण याचे ज्वलंत उदाहरण आहे. तेथील गावकरी लोकांनी जादुटोण्याच्या संशयावरून गावातीलच महीलांना व पुरूषाला भर चौकात खांबाला बांधून मारून मारून जखमी केले. हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार तिथे घडला आहे.  देशात संवीधान असूनही असे कृत्य घडत आहेत. ही लाजीरवाणी बाब आहे. याला जबाबदार संविधान नसून त्याची अंमलबजावणी करणारे लोक आहेत. कायदयाची कठोर अंमलबजावणी झाली तरच अशा अमानुष कृत्यांना लगाम लागू शकतो. जातीवादही तेवढयाच जोमाने वाढतानी दिसून येत आहे. अजूनही अस्पृश्य समजल्या जाणारी मानसिकता समाजात तग धरून बसलेली आहे. एखाद्या कार्यालयात जर अनु. जातीमधील विशेषतः (?) व्यक्ती असेल तर तो तिथे मोकळेपणानं कामच करू शकत नाही. ही वास्तविकता आहे. हे जातीयतेचे विष बालपणापासूनच संस्कारातून पेरल्या जाते. या विकृत मानसिकतेला मातीमोल करणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपल्याला स्वयंप्रकाशीत होवून सामान्यजानांना सुज्ञ करावे लागेल. 

     आज प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तणावात जीवन जगतांना दिसत आहे. हा तणावच त्याला मानसिक रूग्ण बनवितो. यांमुळे अनेक विघातक कृत्य त्याच्या हातून घडतात. तणावाला घालविण्यासाठी कधी तो व्यसन करतो,त्यात तो व्यसनाधीन बनत जातो. किंवा मानसिक विकृती झाल्यास वैदयकीय उपचार न करता एखाद्या भोंदु मांत्रीकाकडे जातो. खरंतर योग्य रीतीने तणावपुर्ण स्थिती हाताळल्या गेली तर नक्कीच तणावमुक्त होता येते. त्यासाठी जो मानसिक रूग्ण आहे त्याला समजून घेऊन त्याचे योग्य समुपदेशन करणे आवश्यक आहे. निव्वळ समुपदेशन करूनच रोग्याला दुरूस्त करता येते. 

सगळा खेळ हा आपल्या मानसिकतेचा आहे. मनावर जसे संस्कार केले जातात तसे तो व्यवहार करतो. मनामध्ये एका मिनीटाला साठ हजार विचार येतात. यांतून काय हिताचे व कोणते बिनकामाचे याचे व्यवस्थापन आपल्याला करता यायला पाहीजे.जे लोकं मनाने खुप कमजोर असतात तेच लोक देवी-देवता व बुवाबाजीचा आश्रय घेतात. मनाने खंबीर माणसे लाथ मारील तिथे पाणी काढतात. म्हणूनच म्हटले आहे की, शरीर कितीही बलवान असले तरी त्यात वासा करणारे मन जर कमजोर असेल तर बलवान शरीराला काही अर्थ नाही. कमजोर शरीरात जर बलवान मन वास करीत असेल तर तो व्यक्ती नेहमी आनंदात जीवन व्यतीत करतो.

तरूणांनी एकत्रीत येवून ही लढाई लढायची आहे. आपले हक्क व अधिकार आपल्याला संघर्ष करून मिळवायचे आहेत. त्यासाठी मनाचे व्यवस्थापन खुप मोलाचे आहे. अनेक महापुरूषांनी मनाचे व्यवस्थापन करूनच अनेक महत्व कार्य केली आहेत. व्यसनाधीनता , व्यभीचार,चोरी,आत्महत्या हे कमजोर व अव्यवस्थीत मनाचे लक्षण आहे. मानवप्राण्यमध्ये अद्भुत सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याची जाणीव होणे गरजेचे आहे.समाजात दोन प्रवृत्ती आढळून येतात. एक सृजनात्मक व दुसरी विघातक. बहुतांश लोक विघातक प्रवृत्तीला जवळ करतात. त्यामुळे त्यांचे पतन होते. आपल्याला सृजनात्मक प्रवृत्तीला पुरस्कृत करावे लागेल. 
 जगदगुरू वंदनीय तथागत सम्यक संबुद्ध यांनी मानवी मनाचा खोलवर अभ्यास केलेला आहे. त्यांच्या तत्वज्ञानावर चालून अनेक देशांनी आपली प्रगती साधलेली आहे. आपला भारत देश हा बुद्ध तत्वज्ञानाच्या भरवशावरच जागतिक महासत्ता बनु शकते. हे माझे ठाम मत आहे.

रोशन खोब्रागडे ९६०४८२४७५९ 
सामाजिक कार्यकर्ता.लाखनी,जिल्हा भंडारा  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com