Top Post Ad

मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्‍कम चोरणाऱ्यांना अटक

 
 नवी मुंबई परिसरातील मंदिरामधील देवाचे दागिणे, वस्तू तसेच दानपेटी फोडून त्यातील रोख रक्‍कम चोरीचे गुन्हे घडत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. याबाबत पोलिसांनी गभीर दखल घेत  नेरूळ परिसरात सापळा लावून  १) सुभाष शितलाप्रसाद केवट, वय ३५ वर्षे, रा. नेरूळ, नवी मुंबई तसेच  मुळ राह. बनारस, उत्तरप्रदेश. २) मगबुल जोमू शेख उफ चिरा, वय ३८ वर्षे, रा. नेरूळ, नवी मुंबई मुळ राह.  पश्‍चिम बंगाल.  ३) राजू मारूती वंजारे, वय ३० वर्षे, राह. शिरवणे गाव, सेक्टर १, नेरूळ, नवी मुंबई मुळ राह.  वाशिम यांना शिताफीने ताब्यात घेतले. सदरचे इसम अतिशय सराईत असल्याने त्यांचेकडे कौशल्यपुर्ण चौकशी केल्यानंतर त्यांनी पाससिक हिल, सीबीडी बेलापूर येथील राधा गिरीधारी मंदिरातील मुर्तीचे चांदिचा मुकूट व दानपेटी फोडून त्यातील रोख रक्‍कम चोरी केल्याची कबुली दिली. या घटनेबाबत सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्हयामध्ये त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच  आरोपींनी चोरी केलेले देवाचे चांदीचे मुकूट वितळुन देणारा असित कालीपदो दास, वय ४५ वर्ष, राह. सी १, शांतीनिकेतन अपार्टमेंट, बिल्डींग नं. ६, दत्त मंदिरा  जवळ, सेक्टर 0३, नेरूळ, नवी मुंबई मुळ राह. जंगलपाडा बाझार, ठाना- चंदीदला, जि. हुकली, कलकत्ता, पश्‍चिम बंगाल यास देखील गुन्हयात अटक केली. 

   अधिक तपासामध्ये आरोपींनी राधा गिरीधारी मंदिर, पाससिक हिल, सीबीडी येथील मुर्तीचे चांदिचा मुकूट व दानपेटीतील रोख रक्‍कम) , विठ्ठल रूखमाई मंदिर, खारकोपर येथील मुतीचे सोन्याचे दागिणे व चांदिच्या पादुका), (बालाजी मंदिर, नेरूळ येथील दानपेटी फोडून रोख रक्‍कम), (चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, मुंबइ -अहमदाबाद हायवे, सातीवली, पालघर येथील मुर्ती) नवी मुंबई, पालघर येथिल वेगवेगळया मंदिरांमध्ये चोरी केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.  गुन्हयातील चोरी केलेले देवदेवतांचे चादिचे मुकूट, पादुका इत्यादी असे सुमारे २ किलो ३५७० ग्रॅम वजनाची  चांदी हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच अधिक तपासामध्ये नमुद आरोपी व त्यांचे साथीदारांनी नवी मुंबई परीसरातून पार्क केलेल्या वाहनांच्या २४ बॅटरी हस्तगत करण्यात आलेल्या असून एकुण त्याचेकडून सुमारे ३,२५७,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.  सदरचे आरोपी हे घरफोडी चोरी करण्यात सराईत असून आरोपी सुभाष शितलाप्रसाद केवट, याचेविरूध्द यापुर्वी मंदिरातील व इतर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मध्यवती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर, सहा. पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, ज्ञानेश्‍वर भेदोडकर, जी.डी. देवडे, व पोलीस अमलदार  नितीन जगताप, सतीश सरफरे, आतिष कदम, लक्ष्मण कोपरकर, अजय कदम, राहुल वाघ, व विजय खरटमोल यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com