ठाणे - जिल्ह्यात आगामी नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर आदी महापालिकांच्या निवडणुकांसाठी सुधारित मतदार याद्या उपयुक्त ठरणार आहे. यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या बैठका घ्याव्यात, निदरेष मतदार यादीच्या कामाला गती द्यावी,अशी तंबी देत आवश्यकता भासल्यास अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्तीच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदणी अधिकाऱ्यांना दिल्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास अनुसरून देशपांडे यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे अन्य जिल्ह्यांसह ठाण्याचा आढावा घेतला. मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी मोहीम' स्वरूपाच्या कामाच निर्देशही देशपांडे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले. या दुरदृष्यप्रणाली आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील 18 मतदार संघातील नोंदणी अधिकाऱ्यांची बैठकही सायंकाळी घेतली. यावेळी जिल्हा उप निवडणूक अधिकारी अर्चना कदम, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे आदी उपस्थित होते.
1 नोव्हेबरपासुन 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे. मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण आणि प्रमाणीकरणसाठी 5 ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे मतदारांनी यादीतील आपले नाव, छायाचित्र 30 सप्टेंबर पूर्वी तपासणी करून घ्यावीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मतदारांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले दोन लाख 92 हजार 239 नावे मतदार यादीतून कायमचे वगळून त्यांना बाद केले आहे. तर 17 हजार 325 मतदारांचे छायाचित्र प्राप्त केले जात आहे. उर्वरित पाच लाख 8 हजार 462 मतदार छायाचित्र मिळवण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे, अशी माहिती ठाणो जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना दिली. मतदारांचे छायाचित्र उपलब्ध करून घेणे, दुबार किंवा समान नोंदी कमी करण्याचे काम जिल्ह्यात सुरू असल्याचे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या